18 नोव्हे
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर अवैध धंद्यांचे माहेर घर असून येथे वरली मटका व प्रतिबंधित गुटख्या व्यवसाय सर्रासपने चालत होता. मागील काही महिन्या पासून गुटखा माफियावर बुलढाणा एलसीबी कडून धडक कार्रवाई करण्यात आली होती त्यामुळे गुटखा माफियाने घाबरून आपला धंदा बंद केला होता पण आता पुन्हा त्याने आपला धंदा सुरु केला असता आज त्याच्या एका ठिकाण्यावर चिखली पोलीसाने धाड टाकून लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त करुण एकाला ताब्यात घेतले तर मुख्य माफिया फरार झाला आहे.
चिखली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खैरुशाह बाबा दर्गाह परिसरात शासन द्वारा प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची चोरुन लपून विक्री होत असल्याची माहीती मिळाल्यावरुन चिखली पोलीसच्या गुन्हे शाखेने कारवाई करत छापा टाकला. यावेळी पोलीसांनी एकास ताब्यात घेतले तर एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.याप्रकरणी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास चिखली शहरात चोरुन लपून राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करणारा अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी याने खैरुशाह बाबा दर्गाह परिसरात गुटखा आणून जहीर खान अजीज खान याचे घरात लपवून ठेवला आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या निर्देशाखाली पोहेकॉ विक्रम काकड, नारायण तायडे, प्रकाश पाटिल, पो.ना. राहुल मेहुणकर, पो कॉ. पुरुषोत्त्म आघाव, गजानन जाधव, पोकॉ सुनिता इंगळे यांनी पंचासह धाड टाकली असता जहिर खान अजीज खान याचे राहते घराची झडती घेतली असता घरामध्ये दोन मोठया पांढऱ्या पोत्यांमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला व नऊ पांढऱ्या रंगाच्या पोतडया आढळून आल्या. त्या उघडल्या असत्या त्यामध्ये 28 पोतडे शासन प्रतिबंधीत गुटखा मिळून आला आहे. यावेळी घटनास्थळावरुन अब्दुल निसार अब्दुल कादर कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे तर जहीर खान अजीज खान यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर माल ताब्यात घेऊन पंचनामा करुन सदर गुटखा पोलीस स्टेशन चिखली येथे जमा करण्यात आला आहे. चिखली पोलीसांनी या कारवाईची माहिती अन्नं व औषध अधिकारी यांना कळविली असल्याचे सांगितले मात्र वृत्त लिहीपर्यंत अन्न व औषध विभागाचा कुणीही अधिकारी चिखलीला फिरकला नव्हता. तर अधिकारी वर्गाशी पत्रकारांनी संपर्क करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.यापुर्वी दि 16 सप्टेंबर 2019 रोजी देखील पोलीसांनी घाड टाकून 3 लाख 64 हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला होता.आता बुलढाणा अन्न व औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी केंव्हा ठाण्यात दाखल होवून पुढची कार्रवाई करतात हे बघावे लागेल.
Post a Comment