बेलापूर (प्रतिनिधी )- आजच्या स्पर्धेच्या युगात अपार मेहनत व कष्ट जो करतो यश त्याच्या पायावर लोटांगण घालते हे अल्पावधीतच लाखावरुन कोटीच्या ठेवी पर्यत पोहोचालेल्या लोकमाता अहील्याबाई होळकर ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेने दाखवुन दिले असल्याचे मत अँड शाळीग्राम होडगर यांनी व्यक्त केले बेलापूर येथील लोकमाता अहील्याबाई होळकर ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राऊत श्रीरामपूर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वासुदेव काळे यशवंत नागरी पतसंस्थेचे ।चेअरमन सुरेश सातव कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड काटेस्वामी पतसंस्थेचे चेअरमन अनिरुध्द महाले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे पत्रकार देविदास देसाई प्रा आशोक बडधे आदि मान्यवर उपस्थित होते होडगर पुढे म्हणाले की पतसंस्था चालविणे फार जिकीरीचे काम आहे बेलापूर गावची बाजारपेठ मोठी असुन ठेवीदारांचा विश्वास पतसंस्थेवर असल्यामुळे ठेवीचे प्रमाण वाढत आहे संस्थानी अशाच प्रकारे आपली विश्वासह्रता टिकवुन ठेवावी असेही ते म्हणाले या वेळी प्रा अशोक बडधे वासुदेव काळे सुरेश सातव कै मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोडअँड विजयराव साळुंके आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी द्वारकनाथ बडधे विप्रदास भास्कर फणसे नवनाथ कुताळ दिलीप दायमा दिपक क्षत्रिय संदिप सोनवणे मिलींद सहापुरकर अशोक प्रधान विनोद जोशी अनिरुध्द महाले व्हा .चेअरमन महेश ओहोळ आदिसह संचालक ठेवीदार ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन आशोक राशिनकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रविण काळे यांनी आभार मानले सूत्रसंचलन पुरुषोत्तम भराटे यांनी केले
Post a Comment