Latest Post

सिल्लोड : (जि.औरंगाबाद) : तालूक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तालूक्यातील सर्व नदी, नाले तुडुंब भरून वहात आहेत. तालुक्यातील शेतशिवार पाण्याखाली गेली आहेत. महसूल विभागांची पथके तालुक्यात रवाना झाली आहेत. धानोरा (ता.सिल्लोड) येथील पाझर तलावाने धोक्याची पातळी घाठली असून, तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तलाव पायथ्याच्या परिसरातील कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांनी आवश्यक साहित्य घेऊन सुरक्षित ठिकान गाठले आहे. तालुक्यात उडालेल्या पावसाच्या हाहाकाराने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून, घरांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

बुलढाणा - 2 नवंबर
बुलढाणा तहसील अंतर्गत के ग्राम देवलघाट के 3 युवक आज दोपहर 3 बजे के समय पैनगंगा नदी में डूब गए थे जिन्हें कुछ युवकों ने बचा लिया है जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है.फिलहाल तीनों युवकों पर बुलढाणा के अस्पताल में उपचार जारी है. 
      प्राप्त जानकारी के अनुसार बुलढाणा से सटे ग्राम देवलघाट के कुछ युवक गांव के पास पैनगंगा नदी पर बने कट्टे पर नहाने के लिए आज 2 नवंबर को दोपहर 3 बजे के करीब गए थे. सबसे पहले फुरकान अहमद अब्दुल वाहब उर्फ बब्बू(28) ने पानी में छलांग लगाई जो भंवर में फंस गया था जिसे बचाने के लिए जुनैद हफीज़ देशख(27) और शेख जाकिर शेख यूनुस (27) ने छलांग लगाई किंतु यह दोनों भी तेज बहाव की चपेट में आ गए जिन्हें किसी तरह वहां मौजूद अन्य युवकों ने बचा लिया और उन्हें बाहर रोड पर ले आए तथा गंभीर हालत वाले दो युवक बब्बू और ज़ाकिर को तत्काल शेख जफर के वाहन से बुलढाणा उपचार के लिए ले जाया गया.जबकि इसी बीच बुलढाणा के पूर्व विधायक हर्षवर्धन सपकाल पाडली की दिशा में जा रहे थे जिन्हें देवलघाट के पास भीड़ दिखाई दी उन्हें जब पता चला तो उन्होंने फौरन अपने वाहन को पलटाया और जुनैद देशमुख को अपने वाहन में डालकर फौरन बुलढाणा के सरकारी अस्पताल में एडमिट कराया.बब्बू और ज़ाकिर पर बुलढाणा के मेहेतरे हॉस्पिटल में उपचार जारी है जबकि जुनैद देशमुख पर सरकारी अस्पताल में उपचार जारी.नायब तहसीलदार पवार, देवलघाट के मंडल अधिकारी राऊत व पटवारी कोलसे अस्पताल पहोंचे थे.

औरंगाबाद : शहरातील सेव्हन हिल विद्यानगर परिसरात बनावट नोटा विक्री करणार्‍या दोघांना सापळा लावून पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. तर या टोळीतील एकाला आझाद चौक, सिडको येथून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मदतीने अटक करण्यात आली.  शेख समरान रशिद (२४,रा. नेहरुनगर) सैय्यद सैफ सय्यद असफ(२४,रा. नेहरु नगर  ) आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मदयार (२२.रा. रांजणगाव शेणपुंजी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शहरात  बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग सुरु आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान एपीआय घनश्याम सोनवणे यांना विद्यानगर परिसरात बनावट नोटाचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यांनी  या भागात सापळा लावला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास सय्यद सैफ हा दुचाकीवर विद्यानगरात आला. त्याठिकाणी सय्यद सलीमला १०० रु. दराच्या बनावट नोटा देतांना सोनवणे यांनी दोघांना ताब्यात घेतले. सैफ ने जप्त केलेल्या नोटा आझाद चौकातील शे.समरान रशीदकडून घेतल्याचे सांगितले. यानंतर रशीद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट नोटांचे संबंध मालेगाव, नाशिक, बदनापूरपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बोगस १२ हजार ४०० रुपये, प्रिंटर, कागद असा एकूण ८६ हजार ८०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांचे एक पथक त्याच्या अटकेसाठी नाशिककडे रवाना झाले आहे.

राहुरी(वार्ताहर)- मुळा धरणातून वांबोरी चारीद्वारे पाथर्डी तालुक्यातील पाझर तलाव भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज मिरी येथे पोहोचणार असून वांबोरी चारीला पाणी सुरू असेपर्यंत वीज पुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, कुठेही लिकेज होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना दिल्या आहेत. या भागातील सर्व तलाव, बंधारे भरल्याशिवाय पाणी बंद करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सकाळी मुळा धरणातून वांबोरी चारीला माजी खासदार प्रसाद तनपुरे, जेऊरचे जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता सायली पाटील, शाखाअभियंता पी. पी. तनपुरे, शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे, वांबोरी चारी विद्युत विभागाचे उपअभियंता दिलीप ढिकले, शाखाअभियंता भरत पाटोळे उपस्थित होते.माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी चारीच्या वीज बिलाची माहिती घेऊन वीज बिल भरण्यासाठी शासन 80 टक्के रक्कम देत असून उर्वरित रक्कम ही शेतकर्‍यांनी भरायची असून लाभधारक शेतकर्‍यांनी आपली बाकी त्वरित भरून सहकार्य करावे, असे आवाहन केले.कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी तनपुरे यांच्या सूचनांचे पालन करून दखल घेतली जाईल, असे सांगितले. वांबोरी चारीचे आजअखेर 1 कोटी रुपये वीजबिल थकीत असून त्यापैकी 40 लाख रुपये भरण्यात आल्याचे सांगितले.जर 3 पंप 24 तास सुरू राहिले तर महिन्याला 20 लाख रुपये वीजबिल येत असल्याचे सांगितले.धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यातून प्रथम मिरी, मजले चिंचोली, शिराळ, या भागातील तलाव भरण्यात येऊन मग इतर भागात पाणी सोडण्यात येईल. यावेळी केशर पतसंस्थेचे अध्यक्ष सागर तनपुरे, सलीम शेख, साजीद शेख, आर. के. पवार, पी. आर. बाचकर, भाऊसाहेब गुलदगड, राजू गरड उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे हे पक्षाच्या बैठकीसाठी मुंबई येथे गेल्याने वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते.

शासनाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदांराचे उत्पन्न वाढावे या साठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असुन या सर्व उपक्रमा ऐवजी दुकानदारांना  मार्जिन  वाढवुन द्यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे या बाबत दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी पुढे म्हटले आहे की शासनाने स्वस्त धान्य पारदर्शकता आणण्याकरीता पाँज मशिन आणल्या त्यामुळे धान्य दुकानाचा कारभार पारदर्शी झाला दुकानदार सघंटनानी वेळोवेळी शासनाकडे कमीशन मार्जिन  वाढवुन मिळणे बाबत मागणी केलेली होती परंतु शासनाने त्या कडे डोळेझाक करत दुकानदारांना  एस बँकेच्या माध्यमातून बँकींग व्यवहार करण्याची परवानगी दिली त्यास संघटनेने विरोध केला नंतर बि बियाणे परवाना दिला त्या नंतर भाजीपाला दुध अंडी विकण्याची परवानगी दिली आता स्टेशनरी विकण्याची मुभा दिली दुकानदार संघटनेच्या प्रमुख मागणीला बगल देवुन हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहे संघटनैची एकच मागणी आहे कमीशन ,मार्जिन वाढवुन मिळावी .शासनाने केरोसीन बंद करुन अनेक विक्रेत्यांचा रोजगार हिसकावुन घेतला आहे त्यांना कुठलाच पर्याय न देता त्यांचा व्यवसाय बंद केला आता रेशन व्यवसाय देखील  त्याच मार्गावर असुन राज्यात ५५ हजार रेशन दुकानदाराचे प्रपंच या व्यवसायावरअवलंबुन आहे याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्यासह कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे सचिव रज्जाक पठाण माणिक जाधव कैलास बोरावके गजानन खाडे गणपत भांगरे रावसाहेब भगत सुरेश उभेदळ विजय दिघे मुकुंद सोनटक्के विश्वासराव जाधव वहाडणे बाबा कराड मोहीते बाबासाहेब ढाकणे आदिंनी केली आहे

बेलापूर  (प्रतिनिधी  )-- राष्ट्रसंत प .पू .स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य  किशोरजी   व्यास महाराज यांचे उपस्थितीत  बेलापूरात विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे                           आचार्य किशोरजी व्यास तथा राष्ट्र  संत प पू स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे सकाळी बेलापूर येथे आगमन होणार असुन बेलापूरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या सुप्रसन्नतेसाठी पंडीत महेश व्यास मोहन खानवेलकर हं भ प सोपान महाराज हिरवे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या श्री हरिहर याग  कार्यक्रमास आचार्य किशोरजी व्यास उपस्थित  राहुन उपस्थितांना उपदेश करणार आहे त्या नंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता जे टी एस हायस्कूलच्या मागील पटांगणात आचार्य  किशोरजी व्यास यांचे जाहीर प्रवचन तसेच आचार्य  किशोरजी व्यास यांच्या हस्ते  कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वस्तुचे वाटप त्या नंतर सांयकाळी जुने बालाजी मंदिर येथे अन्नकुट उत्सव  अशा प्रकारे  विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे  तरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे


अहमदनगर - जामखेड येथील आरोळेवस्ती येथे बुधवार (दि.३०) रात्री घरात बळजबरीने घुसून मारहाण करीत महिल्याच्या गळ्यातील गंठण चोरून नेल्याच्या घटनेतील आरोपी २४ तासाच्या आत पकडण्याची महत्त्व पूर्ण कामगिरी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दीपक उर्फ सलीम नारायण भोसले (वय २४ रा.वाहिरा, ता.आष्टी जि.बीड), लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले (वय २१) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, घराचा दरवाजा तोडून घरातील माणसांना मारहाण करून ७ हजार रोख रक्कम व आधारकार्ड, पँनकार्ड व अन्य कागदपत्रे बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद रणजित बाबुराव खाडे (रा.राजुरी ता.जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना दाखल गुन्हा हा सलीम भोसले व लखन भोसले या दोघांनी केला असून ही दोन्ही आरोपी हे नवाबपूर ता.गंगापूर जि.औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे लपवून बसले आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सलीम व लखन भोसले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या कडे चौकशी केली असता, टोळी प्रमुख व भाऊ गोरख नारायण भोसले ( रा.वाहिरा ता.आष्टी), नाज्या उर्फ सोमीनाथ उर्फ दिलीप नेहऱ्या काळे (रा.घुमरी ता.कर्जत), रावसाहेब विलास भोसले ( रा. हातवळण ता.आष्टी) अशी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, पोसई गणेश इंगळे, पोहेकाँ सुनिल चव्हाण, सफौ सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, विशाल दळवी, रविंद्र कर्डिले, रवि सोनटक्के, संदीप दरदंले, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, दीपक शिंदे, सचिन कोळेकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget