बनावट नोटा तयार करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; तीनजण गजाआड.

औरंगाबाद : शहरातील सेव्हन हिल विद्यानगर परिसरात बनावट नोटा विक्री करणार्‍या दोघांना सापळा लावून पुंडलिक नगर पोलिसांनी अटक केली. तर या टोळीतील एकाला आझाद चौक, सिडको येथून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मदतीने अटक करण्यात आली.  शेख समरान रशिद (२४,रा. नेहरुनगर) सैय्यद सैफ सय्यद असफ(२४,रा. नेहरु नगर  ) आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मदयार (२२.रा. रांजणगाव शेणपुंजी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शहरात  बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग सुरु आहेत. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान एपीआय घनश्याम सोनवणे यांना विद्यानगर परिसरात बनावट नोटाचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यांनी  या भागात सापळा लावला. रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास सय्यद सैफ हा दुचाकीवर विद्यानगरात आला. त्याठिकाणी सय्यद सलीमला १०० रु. दराच्या बनावट नोटा देतांना सोनवणे यांनी दोघांना ताब्यात घेतले. सैफ ने जप्त केलेल्या नोटा आझाद चौकातील शे.समरान रशीदकडून घेतल्याचे सांगितले. यानंतर रशीद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट नोटांचे संबंध मालेगाव, नाशिक, बदनापूरपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून बोगस १२ हजार ४०० रुपये, प्रिंटर, कागद असा एकूण ८६ हजार ८०० रुपयाचा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांचे एक पथक त्याच्या अटकेसाठी नाशिककडे रवाना झाले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget