सिल्लोड : (जि.औरंगाबाद) : तालूक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तालूक्यातील सर्व नदी, नाले तुडुंब भरून वहात आहेत. तालुक्यातील शेतशिवार पाण्याखाली गेली आहेत. महसूल विभागांची पथके तालुक्यात रवाना झाली आहेत. धानोरा (ता.सिल्लोड) येथील पाझर तलावाने धोक्याची पातळी घाठली असून, तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तलाव पायथ्याच्या परिसरातील कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांनी आवश्यक साहित्य घेऊन सुरक्षित ठिकान गाठले आहे. तालुक्यात उडालेल्या पावसाच्या हाहाकाराने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून, घरांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
Post a Comment