पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नुकसानीची पाहणी.शिवसेनेची बांधिलकी शेतकऱ्यांसोबत ; प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार - मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.2, परतीचा पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत, शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल अशी ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

परतीच्या पावसामुळे सिल्लोड तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना ना. शिंदे बोलत होते.

या दरम्यान शिवसेना सचिव अनिल देसाई, शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार, उदयसिंग राजपूत, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड देवयानी डोंनगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना अटी व शर्ती बाजूला ठेवून पीक विमा काढलेल्या व विमा न काढलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची तसेच रब्बी पिकासाठी बियाणे व खते मोफत देण्यात यावे, जनावरांना आता दावणीवर चारा उपलब्ध करण्याची मागणी केली.

यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहेत. विमा कंपनी यांना नुकसान भरपाई देण्यासाठी फार किचकट अटी न लावता नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जितके नुकसान तितके भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना रब्बीसाठी मदत तसेच जनावरांना चारा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री शिंदे यांनी दिली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget