बेलापूर (प्रतिनिधी )-- राष्ट्रसंत प .पू .स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास महाराज यांचे उपस्थितीत बेलापूरात विविध धार्मिक कार्यक्रम व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे आचार्य किशोरजी व्यास तथा राष्ट्र संत प पू स्वामी गोविंददेवगिरीजी यांचे सकाळी बेलापूर येथे आगमन होणार असुन बेलापूरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या सुप्रसन्नतेसाठी पंडीत महेश व्यास मोहन खानवेलकर हं भ प सोपान महाराज हिरवे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आलेल्या श्री हरिहर याग कार्यक्रमास आचार्य किशोरजी व्यास उपस्थित राहुन उपस्थितांना उपदेश करणार आहे त्या नंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता जे टी एस हायस्कूलच्या मागील पटांगणात आचार्य किशोरजी व्यास यांचे जाहीर प्रवचन तसेच आचार्य किशोरजी व्यास यांच्या हस्ते कै .मुरलीधर खटोड पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वस्तुचे वाटप त्या नंतर सांयकाळी जुने बालाजी मंदिर येथे अन्नकुट उत्सव अशा प्रकारे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे
Post a Comment