अहमदनगर - जामखेड येथील आरोळेवस्ती येथे बुधवार (दि.३०) रात्री घरात बळजबरीने घुसून मारहाण करीत महिल्याच्या गळ्यातील गंठण चोरून नेल्याच्या घटनेतील आरोपी २४ तासाच्या आत पकडण्याची महत्त्व पूर्ण कामगिरी नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. दीपक उर्फ सलीम नारायण भोसले (वय २४ रा.वाहिरा, ता.आष्टी जि.बीड), लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले (वय २१) पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, घराचा दरवाजा तोडून घरातील माणसांना मारहाण करून ७ हजार रोख रक्कम व आधारकार्ड, पँनकार्ड व अन्य कागदपत्रे बळजबरीने चोरून नेल्याची फिर्याद रणजित बाबुराव खाडे (रा.राजुरी ता.जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना दाखल गुन्हा हा सलीम भोसले व लखन भोसले या दोघांनी केला असून ही दोन्ही आरोपी हे नवाबपूर ता.गंगापूर जि.औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे लपवून बसले आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पवार यांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सलीम व लखन भोसले या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या कडे चौकशी केली असता, टोळी प्रमुख व भाऊ गोरख नारायण भोसले ( रा.वाहिरा ता.आष्टी), नाज्या उर्फ सोमीनाथ उर्फ दिलीप नेहऱ्या काळे (रा.घुमरी ता.कर्जत), रावसाहेब विलास भोसले ( रा. हातवळण ता.आष्टी) अशी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पकडण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Post a Comment