शासनाने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदांराचे उत्पन्न वाढावे या साठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असुन या सर्व उपक्रमा ऐवजी दुकानदारांना मार्जिन वाढवुन द्यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे या बाबत दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुढे म्हटले आहे की शासनाने स्वस्त धान्य पारदर्शकता आणण्याकरीता पाँज मशिन आणल्या त्यामुळे धान्य दुकानाचा कारभार पारदर्शी झाला दुकानदार सघंटनानी वेळोवेळी शासनाकडे कमीशन मार्जिन वाढवुन मिळणे बाबत मागणी केलेली होती परंतु शासनाने त्या कडे डोळेझाक करत दुकानदारांना एस बँकेच्या माध्यमातून बँकींग व्यवहार करण्याची परवानगी दिली त्यास संघटनेने विरोध केला नंतर बि बियाणे परवाना दिला त्या नंतर भाजीपाला दुध अंडी विकण्याची परवानगी दिली आता स्टेशनरी विकण्याची मुभा दिली दुकानदार संघटनेच्या प्रमुख मागणीला बगल देवुन हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहे संघटनैची एकच मागणी आहे कमीशन ,मार्जिन वाढवुन मिळावी .शासनाने केरोसीन बंद करुन अनेक विक्रेत्यांचा रोजगार हिसकावुन घेतला आहे त्यांना कुठलाच पर्याय न देता त्यांचा व्यवसाय बंद केला आता रेशन व्यवसाय देखील त्याच मार्गावर असुन राज्यात ५५ हजार रेशन दुकानदाराचे प्रपंच या व्यवसायावरअवलंबुन आहे याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्यासह कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे सचिव रज्जाक पठाण माणिक जाधव कैलास बोरावके गजानन खाडे गणपत भांगरे रावसाहेब भगत सुरेश उभेदळ विजय दिघे मुकुंद सोनटक्के विश्वासराव जाधव वहाडणे बाबा कराड मोहीते बाबासाहेब ढाकणे आदिंनी केली आहे
Post a Comment