Latest Post

बुलढाणा - 17 अक्तुबर, कासिम शेख
बुलढाणा जिला अंतर्गत के ग्राम धाड के एक 20 वर्षीय युवक कांग्रेस पार्टी की टी-शर्ट पहनकर एक पेड़ से फांसी लगाकर झूलता हुआ आज 17 अक्तुबर को नजर आने के बाद इलाके में खलबली मची हुई है बता दें कि 13 अक्टूबर को भी बुलढाणा जिले के ग्राम खातखेड़ में भी एक युवक ने भाजपा की टीशर्ट पहन कर आत्महत्या कर ली थी  मृतक युवक का नाम सतीश मोरे है जिसने चिखली विधानसभा निर्वाचन क्षेत्र से कांग्रेस प्रत्याशी राहुल बोंद्रे के समर्थन में तैयार की गई टी-शर्ट पहन रखी है जिस पर कांग्रेस का चुनावी निशान "पंजा" और "मी राहुल भाऊ समर्थक" (मैं राहुल भाऊ का समर्थक) ऐसा लिखा हुआ है. यह मामला प्रकाश में आने के बाद तत्काल पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर पंचनामा किया और शव को पोस्टमार्टम के लिए धाड़ के ग्रामीण अस्पताल में भेज दिया है. बता दे कि विगत 13 अक्तुबर को बुलढाणा जिले के जलगांव जामोद विधानसभा निर्वाचन क्षेत्र के ग्राम खातखेड़ निवासी राजू तलवारे ने भी एक पेड़ से फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी और खास बात तो यह है कि इसी दिन राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस घटनास्थल से कुछ किलोमीटर दूरी पर भाजपा प्रत्याशी डॉ. संजय कुटे कर प्रचार के लिए जनसभा को संबोधित करने के लिए आने वाले थे. प्राथमिक रूप से ये जानकारी सामने आई है कि,मृतक सतीश मोरे निजी कर्ज़ के बोझ तले दबे हुआ था जिस से वे काफी परेशान था.जो कल से घर निकला था पर रात भी घर नही लौटा और आज सुबह उसका शव पेड़ से लटका हुआ नजर आया.बुलढाणा जिले में पहेले भाजपा और अब कांग्रेस की टीशर्ट पहनकर आत्महत्या की इन दोनों घटनाओं से जिले भर के राजकीय माहौल में उबाल देखने को मिल रहा है.

अहमदनगर (प्रतिनिधी) कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड याला जिल्हा व सत्र न्यायालय, कोपरगाव यांच्या न्यायालयाने भादंवि कलम 376, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायद्यान्वये दोषी धरले असून त्याला भादंवि 376 नुसार 10 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, भादंवि कलम 506 नुसार 2 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड, पोक्सो अन्वये 7 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.खडकी (ता. कोपरगाव) शिवरात 18 फेब्रुवारी 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक 1 कोपरगाव यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत व हवेत झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यात एका गटातील आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर इतर आरोपी पसार झाले आहेत.मंगळवारी वडाळा महादेव परिसरात दोन गटांत हाणामारी होऊन हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पो.ना. सचिन कुमार रामदास बैसाणे यांनी दहा ते बारा अज्ञात आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, 10 ते 12 अज्ञात आरोपी यांनी हातात दांडके, तलवार, गावठी कट्टा घेऊन बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करत होते. आम्ही त्यांना थांबा म्हणूनही जमावातील इसम दुसर्‍या जमावातील इसमावर गावठी कट्ट्याने ठार मारण्याच्या उद्देशाने राउंड फायर केला. त्यानुसार पोलिसांनी बाबासाहेब छेदीदास जाधव (वय 26), प्रकाश बाळासाहेब रणवरे (वय 24), विजय किशोर मैड (वय-28), सोमनाथ बापू चितळे (वय-24), मनोज यशवंत पवार (वय-24), रितेश खंडू जाधव (वय-21) (सर्व रा. टाकळीभान) तर तन्वीर सलीम शेख (वय-23, मिरावली पहाड रोड नगर), प्रशांत रंगनाथ नागले (वय-27, रा. घोगरगाव) या आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर (एम. एच. 17 बी. क्यू. 972), विनानंबरची बुलेट, बजाज प्लॅटिना एम. एच. 17 बी. आर. 7641), हिरो एच. एफ. डिलक्स (एम. एच. 17 सिडी 3337), विना नंबरची यामाहा यासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे ताब्यात घेतली आहेत. याबाबत पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत. दुसरी फिर्याद सोमनाथ बापू चितळे (वय 24, रा.इंदिरानगर टाकळीभान ता.श्रीरामपूर) यांनी तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे (रा.टाकळीभान) व इतर 6 जणांविरुद्ध दिली आहे. त्यात म्हटले आहे अक्षता मंगल कार्यालय वडाळा महादेव येथे आपल्या गावातील प्रशांत नागले, प्रकाश रन्नवरे, मनोज पवार, बाळासाहेब जाधव, रितेश जाधव, विजय मैड व तनवीर शेख यांच्या सोबत थांबलेलो होतो. कबड्डी ग्रुपचा कुणाल पवार याचे काही मुलांसोबत भांडणे झाली होती.त्या भांडणाच्या कारणावरून तुषार पवार, प्रकाश माळी, सागर पठाडे व त्यांच्या सोबत इतर 6 मुलांनी मोटारसायकलवरून पिस्तुल व तलवारीसह ट्रिपलसीट येऊन आमच्या दिशेने गोळीबार करून तलवारी दाखवून दहशत निर्माण केली. तसेच एका घराच्या दरवाजावर वार केले. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून हे सर्व आरोपी पसार झाले आहेत. या गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील करीत आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यामध्ये असून निवडणूक प्रक्रीया शांततेत व सुरळीतपणे पार पडावी म्हणून ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सुमारे 45 जणांवर सीआरपीसी 144 प्रमाणे हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तालुका बंदी हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये अर्जुन खुशाल दाभाडे (रा. गोंधवणी, वॉर्ड नं. 1) सागर श्रावण भोसले (रा.दत्तनगर, ता.श्रीरामपूर), नाना बाळू गुंजाळ (रा.उक्कलगाव), विजय उर्फ दुर्गेश कचरुलाल जैस्वाल (रा. वॉर्ड नं.6, सुभाष कॉलनी), सचिन उर्फ गुड्डु रामअकबल यादव (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱ रोड), सचिन सुभाष बाकलीवाल (रा. वॉर्ड नं.1, आदर्शनगर), जिशान फारुक शेख (रा. वॉर्ड नं.7, बेलापूररोड), शोएब सत्तार शेख (रा. वॉर्ड नं.1, फातेमा हौ.सोसायटी), प्रकाश शिवाजी रन्नवरे (रा.वॉर्ड नं.1), फैय्याज नासीर कुरेशी उर्फ नल्ला (रा. वॉर्ड नं.1, मिल्लतनगर), मोहसीन रफिक शेख (रा. वॉर्ड नं. 4, नॉर्दनब्रँच चुना भट्टी), अमोल गोपाळ नानुस्कर (रा. वॉर्ड नं. 6, डावखऱरोड), प्रकाश अरुण चित्ते (रा. वॉर्ड नं.1, गोपाळनगर), शाहरुख अफसर शेख (रा. सुभाष कॉलनी, वॉर्ड नं.6), सचिन लक्ष्मण सोनवणे (रा.गोंधवणी रोड, वॉर्ड नं.1), शुभम बबन शेळके (रा.गोंधवणी, वॉर्ड नं.1), करण मिथुन शेळके (रा.गोंधवणी), दीपक अशोक परदेशी (रा.वॉर्ड नं.5), गणपत कुंडलिक गांगुर्डे (रा.वडाळा महादेव), अजय पांडुरंग शिंदे (रा.दत्तनगर), दत्तात्रय जगन्नाथ जाधव (रा.शिरसगाव), दीपक बाळासाहेब चव्हाण (रा. वॉर्ड नं. 3), कुणाल विजय कारंडे (रा. वॉर्ड नं.5, गिरमे बिल्डींग मेनरोड), संदीप विजय वाघमारे (रा.खंडाळा), योगेश कारभारी त्रिभुवन (रा.टिळकनगर), मोहन भगवान आव्हाड (रा.सूतगिरणी रोड), राजेंद्र पुंडलिक भालेराव (रा.निपाणी वडगाव,), आसिफ दाऊद तांबोळी उर्फ आसिफ रिक्षावाला (रा- वॉर्ड नं.2, बाबरपुराचौक), आदिल मकदुम हुसैन शेख (रा. वॉर्ड नं. 2, वेस्टर्न रेसिडन्सी), शेख सलिम मोहम्मद अब्दुल सत्तार जहागिरदार उर्फ सलिम जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, गुलशन चौक), फिरोज हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), अमजद हबीब पोपटीया (रा. वॉर्ड नं.2), शरीफ लतिफ शेख (रा. वॉर्ड नं.2, बजरंगचौक), अमन आयुब शेख (रा. वॉर्ड नं.2), जुनेद बाबा शेख (रा. वॉर्ड नं. 2), अल्तमश युनूस शेख (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), संजय दानबहादूर यादव (रा.अहिल्यादेवीनगर वॉर्ड नं.2), रईस अब्दुलगणी शेख जहागिरदार (रा. वॉर्ड नं.2, जहागिरदार बिल्डींग), मुजम्मिल हारुण बागवान (रा. वॉर्ड नं.2, सुभेदारवस्ती), आशु ऊर्फ आसिफ लियाकत पठाण (रा. वॉर्ड नं.2, पाण्याचे टाकीजवळ), हुजैफ युनुस शेख जमादार (रा. वॉर्ड नं.2, काझीबाबारोड), गुलाब नबाबगणी कुरेशी (रा. वार्ड नं.2, सुभेदारवस्ती), अकिल शरीफ कुरेशी (वॉर्ड नं.2), आसिफ मुश्ताक शेख (वॉर्ड नं.2), बबलु दिलीप शेळके (रा. गोंधवणी) आदींचा समावेश आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) आधी मटण खाऊ घातले. मटण खाल्ले नाही याचाच राग आल्याने दोघांनी गुंडेगावातील एकाला पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली असून त्याला नगरच्या सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजय पोपट जाधव (वय- 48 रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या जबाबावरुन बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर या दोघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि. 14) सकाळी संजय जाधवला आरोपीने घरी मटण खाण्यासाठी बोलावून घेतले. जाधव याची इच्छा नसतानाही मटण खाण्यास भाग पाडले. नंतर नकार दिल्याने गावातील रामेश्वर मंगल कार्यालयात आणून दोघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बापू हराळ याने धारदार शस्त्राने वार केले व पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये संजय जाधव हे भाजलेले असल्याने त्यांना उपचारासाठी नगरच्या सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगर तालुका पोलीसांनी बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.

अहमदनगर (प्रतिनिधी)-बनावट चलन आणि दस्तावेज तयार करून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामासाठी डांबराचे एकच चलन अनेक कामांना दाखवून लाखो रुपयांची आर्थिक लूट केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेत उजेडात आले आहे. हा प्रकार एकाच कंत्राटदाराने केला असून अन्य कंत्राटदार आणि कामांमध्येही असा प्रकार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्य सर्वच कंत्राटदार आणि कामे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील डांबर घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.जिल्हा परिषदेत श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख याने बनावट दस्तावेज आणि चलनाच्या आधारे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अशोक मुंडे यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यात संबंधित ठेकदाराने केलेल्या संगमनेरच्या कामात 229.65 आणि जिल्हा परिषदेकडील कामात 44.64 मेट्रिक टन अशी 274.29 मेट्रिक टनाची तफावत दिसत आहे.
शेख यांनी वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात एकाच डांबर खरेदीच्या चलनाचा वापर करून 60 ते 65 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चौकशी समितीने ठेवला आहे. शेख याने संगमनेर बांधकाम विभागांतर्गत हरेगाव-उंदिरगाव-नाऊर रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर-नेवासा रस्ता, भामाठाण ते माळवडगाव रस्ता, टाकळीभान ते मुठेवडगाव रस्ता, वळदगाव-निपाणी-वडगाव-टाकळीभान-घोगरगाव रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर -नेवासा रस्ता हे बिल पाच वेळा, तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागातील गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्ता, मालुंजा मातापूर रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव- ब्राम्हणगाव- खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, माळेगाव-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, गोंडेगाव-उंदीरगाव ते खानापूर रस्ता, टाकळीभान-गुजरवाडी-वांगी रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव-खैरी निमगाव ते जाफ्रारबाद रस्ता, माळेवाडी-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, निमगाव खैरी ते दिघी मार्ग, खंडाळा-उक्कलगाव रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी ते चितळी रस्ता, उंदीरगाव ते भालदंड रस्ता, ब्राम्हणगाव वेताळ ते शिरसगाव रस्ता, पुणतांबा ते पुरणगाव रस्ता, खंडाळा येथील मंदिर रस्ता, गोंधवणी-रांजणी शिवरस्ता, उंबरगाव-अशोकनगर कारखान्याकडील भोसले वस्ती रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी रस्ता, शिरसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता आदी रस्त्यांची कामे केली असून या कामांमध्ये डांबराच्या बनावट चलनाचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने निविदा समितीला विश्वासात न घेता परस्पर 8 कोटी 18 लाखांच्या बंधार्‍यांच्या कामाला मान्यता दिली आहे. हा प्रकार गेल्या महिन्यांत दै. सार्वमतने ‘जिल्हा परिषदेत ई-टेंडर घोटाळा’ या आशयाचे वृत्त छापल्यानंतर समोर आला. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यावेळी बांधकाम विभाग आणि लघु पाटबंधारे विभागातील 10 लाखांच्या आतील कामे तपासण्याचा निर्णय घेतल्यानंतर 140 बंधार्‍यांच्या कामांना परस्पर मान्यता दिल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उत्तर आणि दक्षिण असे स्वतंत्र विभाग आहेत. यासह लघु पाटबंधारे हा देखील स्वतंत्र विभाग आहे. या विभागाला रस्त्यांची अथवा बंधार्‍यांची कामे करताना 19 ऑक्टोबर 2011 च्या शासन निर्णयानुसार कामे मंजूर करण्यापूर्वी निविदा समितीची (टेंडर कमिटी) मान्यता घेणे आवश्यक असते. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचा मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचा समावेश असतो. संबंधित विभागाचा कार्यालयीन प्रमुख हा समितीचा सचिव असतो. या समितीची बैठक होऊन त्यात कामांना मंजुरी देण्यात येतात आणि त्यानंतर संबंधित कामे करण्यात येतात.लघू पाटबंधारे विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब न करता परस्पर दहा लाख रुपयांच्या आतील कामे मंजूर केली आहेत. हा प्रकार अनेक दिवसांपासून लपून होता. मात्र, गत महिन्यांत 20 सप्टेंबरला सार्वमतने जिल्हा परिषदेतील ई-निविदा प्रक्रियेत घोटाळा असल्याचे वृत्त दिले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बांधकाम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या ई-निविदा तपासल्या असता 140 कामांच्या निविदा परस्पर मंजूर केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने लघू पाटबंधारे विभागाला मंगळवारी नोटीस दिली असून दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी त्यावेळी लघु पाटबंधारे विभागाला नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसला उत्तर देतांना संबंधित विभागाने जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्री यांची महत्वकांक्षी योजना असून कामे जलद पद्धतीने व्हावीत, तसेच तोंडी सूचना आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी खातेप्रमुखांना निविदा नस्ती मार्किंग केल्यामुळे या 140 कामांना कार्यारंभ आदेश दिला असल्याचे मान्य केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget