अहमदनगर (प्रतिनिधी) आधी मटण खाऊ घातले. मटण खाल्ले नाही याचाच राग आल्याने दोघांनी गुंडेगावातील एकाला पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये ती व्यक्ती जखमी झाली असून त्याला नगरच्या सिव्हिल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संजय पोपट जाधव (वय- 48 रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या जबाबावरुन बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर या दोघांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी (दि. 14) सकाळी संजय जाधवला आरोपीने घरी मटण खाण्यासाठी बोलावून घेतले. जाधव याची इच्छा नसतानाही मटण खाण्यास भाग पाडले. नंतर नकार दिल्याने गावातील रामेश्वर मंगल कार्यालयात आणून दोघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. बापू हराळ याने धारदार शस्त्राने वार केले व पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये संजय जाधव हे भाजलेले असल्याने त्यांना उपचारासाठी नगरच्या सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या जबाबावरुन नगर तालुका पोलीसांनी बापू एकनाथ हराळ व ज्ञानदेव उत्तम कुसळकर यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.
Post a Comment