अहमदनगर (प्रतिनिधी)-बनावट चलन आणि दस्तावेज तयार करून जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामासाठी डांबराचे एकच चलन अनेक कामांना दाखवून लाखो रुपयांची आर्थिक लूट केल्याचे प्रकरण जिल्हा परिषदेत उजेडात आले आहे. हा प्रकार एकाच कंत्राटदाराने केला असून अन्य कंत्राटदार आणि कामांमध्येही असा प्रकार झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्य सर्वच कंत्राटदार आणि कामे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील डांबर घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.जिल्हा परिषदेत श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख याने बनावट दस्तावेज आणि चलनाच्या आधारे सरकारची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अशोक मुंडे यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. यात संबंधित ठेकदाराने केलेल्या संगमनेरच्या कामात 229.65 आणि जिल्हा परिषदेकडील कामात 44.64 मेट्रिक टन अशी 274.29 मेट्रिक टनाची तफावत दिसत आहे.
शेख यांनी वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामात एकाच डांबर खरेदीच्या चलनाचा वापर करून 60 ते 65 लाख रुपयांची शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चौकशी समितीने ठेवला आहे. शेख याने संगमनेर बांधकाम विभागांतर्गत हरेगाव-उंदिरगाव-नाऊर रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर-नेवासा रस्ता, भामाठाण ते माळवडगाव रस्ता, टाकळीभान ते मुठेवडगाव रस्ता, वळदगाव-निपाणी-वडगाव-टाकळीभान-घोगरगाव रस्ता, खंडाळा-श्रीरामपूर -नेवासा रस्ता हे बिल पाच वेळा, तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागातील गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्ता, मालुंजा मातापूर रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव- ब्राम्हणगाव- खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, माळेगाव-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, गोंडेगाव-उंदीरगाव ते खानापूर रस्ता, टाकळीभान-गुजरवाडी-वांगी रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव-खैरी निमगाव ते जाफ्रारबाद रस्ता, माळेवाडी-सराला ते जिल्हा परिषद हद्द रस्ता, मालुंजा-मातापूर ते राष्ट्रीय मार्ग रस्ता, उंबरगाव-मातापूर-कारेगाव-भोकर-मुठेवडगाव-ब्राम्हणगाव खैरीनिमगाव ते जाफ्राबाद रस्ता, निमगाव खैरी ते दिघी मार्ग, खंडाळा-उक्कलगाव रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी ते चितळी रस्ता, उंदीरगाव ते भालदंड रस्ता, ब्राम्हणगाव वेताळ ते शिरसगाव रस्ता, पुणतांबा ते पुरणगाव रस्ता, खंडाळा येथील मंदिर रस्ता, गोंधवणी-रांजणी शिवरस्ता, उंबरगाव-अशोकनगर कारखान्याकडील भोसले वस्ती रस्ता, गोगलगाव ते पिंप्री निर्मळ-वाकडी रस्ता, शिरसगाव ते ब्राम्हणगाव रस्ता आदी रस्त्यांची कामे केली असून या कामांमध्ये डांबराच्या बनावट चलनाचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे.
Post a Comment