अहमदनगर (प्रतिनिधी) कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड याला जिल्हा व सत्र न्यायालय, कोपरगाव यांच्या न्यायालयाने भादंवि कलम 376, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा, पोक्सो कायद्यान्वये दोषी धरले असून त्याला भादंवि 376 नुसार 10 वर्षे शिक्षा व 5 हजार रुपये दंड, भादंवि कलम 506 नुसार 2 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड, पोक्सो अन्वये 7 वर्षे शिक्षा व 2 हजार रुपये दंड तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.खडकी (ता. कोपरगाव) शिवरात 18 फेब्रुवारी 2018 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शशिकांत उर्फ दादा भाऊराव गरड यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक 1 कोपरगाव यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी केला.
Post a Comment