Latest Post


बेलापूर परिसरातील सुभाषवाडी येथील जि. प.प्राथ. शाळेजवळच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत जे. टी. एस.हायस्कूल,बेलापूर इ.५ वी अ मधील विद्यार्थी चिं. ओम विजय नंदिरे घराजवळ असलेल्या विहिरीत पाय घसरून पडला सदर विद्यार्थ्यास पोहता येत नव्हते.घटना घडत असतांना याच शाळेतील विद्यार्थी चिं. विकास बहिरूनाथ कांबळे(९वी) व चिं. कृष्णा दिलीप नवले(८वी) यांनी पाहिले.
आपल्या प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान व धाडस दाखवून चिं. विकास कांबळे याने विहिरीत उडी घेतली व चिं. ओम नंदिरे यास विहिरीत पाण्यात बुडण्यापासून वाचविले व जीवदान दिले.
त्याच्या या शौर्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.उंडे मॅडम,पर्यवेक्षक श्री.तायडे सर ,वर्गशिक्षक श्री.थोरात सर व सर्व सेवकवृंदानी त्याच्या या धाडसाचे कौतुक करून अभिनंदन केले.
त्याच्या या शौर्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा बाल शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

बुलढाणा - 1 अक्तुबर
बुलढाणा से विद्यमान विधायक व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के सचिव हर्षवर्धन सपकाल ने आज ज़ोरदार शक्तिप्रदर्शन करते हुए बुलढ़ाणा तहसील कार्यालय में अपनी उम्मीदवारी के लिए नामांकन पत्र दाखिल किया है.
        काँग्रेस ने 29 सितंबर को महाराष्ट्र के 51 उम्मीदवारों के नाम की घोषणा की थी जिसमें बुलढाणा से हर्षवर्धन सपकाल का समावेश था.विगत 2014 के विधानसभा चुनाव में

विचार,विश्वास और विकास इस त्रिसुत्री मुद्दे को लेकर चुमाइ मैदान में उतरकर जनता का विश्वास संपादन कर जीत हासिल की और फिर अच्छे विचारों के साथ विकासात्मक काम किये.इस चुनाव में काँग्रेस की ओर से प्रत्याशी घोषित किए जाने के बाद आज 1 अक्तुबर को विशाल जनसमुदाय की उपस्थिति में बुलढाणा शहर में रैली निकाली गई जो शहर के मुख्य मार्गों से होते हुए गांधी भवन पहोंची जिसे काँग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस के नेताओं ने संबोधित किया.इस समय मंच पर राष्ट्रवादी के डॉ. राजेंद्र शिंगणे,नरेश शेलके,डी.एस.लहाने,टी.डी. अंभोरे,काँग्रेस जिलाध्यक्ष राहुल बोन्द्रे,शाम उमालकर,मुखत्यारसिंह राजपूत सहित अन्य पदाधिकारी मौजूद थे.पश्चात सपकाल तहसील कार्यालय पहोंचे और अपना नामंकन पत्र डॉ. राजेंद्र शिंगणे,शाम उमालकर, मुखत्यारसिंह राजपूत,राहुल बोन्द्रे व पत्नी मृणालिनी सपकाल की उपस्तिथि में दाखिल किया है.

औरंगाबाद प्रतीनीधी:- युवा शक्ती पत्रकार संघ आणि साप्ताहीक युवा तर्फे समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.हा कार्यक्रम मौलाना अब्दुल कलाम आझाद रिसर्च सेंटर ,औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना युवा गौरव पुरस्कार २०१९ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराने सर्वत्र समाज माध्यमांमध्ये पुजा यांचे कौतुक होत आहे.गोरगरिबांना नेहमी मदत करने गरजु पेशंटला रक्त मेडिकल जेवनाचे डबे पुरवणे आदि काम शासकीय रुग्णालयात माणुसकी समुहातर्फे केले जाते या आधीही पुजाला भुमीकन्या पुरस्कार लोकपत्र 2017 तर्फे राष्ट्रहित जनाधार वीश्वस्त मंडळ तर्फे 2018 पुरस्कार मिळाला आहे.पत्रकारिता क्षेत्रात लेखनीचा बादशाह म्हणुन ओळख असलेल्या अनील कुमार जमधडे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करन्यात आले.व फोटोग्राफर आनीस रामपुरे यांना युवा गौरव पुरस्कार व आदर्श शीक्षक विशाल टिप्रमवार यांनाही आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनवर खान हे होते. तर प्रमुख पाहुणे जेष्ट नेते ईब्राहिम पठाण, दैनिक हिंदुस्तानचे संपादक नायाब अन्सारी, पत्रकार डॉ अब्दुल कदीर, एशिया एक्सप्रेसचे शारेख नक्शबंदी, मोहसिन अहेमद, सकाळचे शेखलाल शेख, गब्बर कमिटीचे मकसुद अन्सारी,  हनिफ बब्बू नगरसेवक छावणी, मोहम्मद जिया, उपसरपंच सय्यद शेरू, शेख खालेद, आदीची उपस्थित
साप्ताहीक युवाचे संपादक अब्दूल कय्युम,समाजसेवक सुमित पंडित,राजेंद्र ढवळे,संपादक हसन शाहा,मकसुद अन्सारी, मुख्तार खान बब्बू भाई, लतीफ खान, अशफाक शेख, रियाज बागवान, शेख यासिन, प्रविण बुरांडे, गणेश पवार, अॕड विलास खरात,आदी उपस्थित होते.पुजा पंडित यांचे माणुसकी समुहातर्फे कौतुक करन्यात आले.
व कार्यक्रमाचे सुत्र संचालक शेख मुक्तार यांनी केले.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- बेलापूर पोलीसांनी बिड येथे चाललेला गव्हाचा भरलेला ट्रक पकडला असुन या बाबत चौकशी चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले     श्रीरामपूर तालुक्यातुन या ट्रकमध्ये गहु भरलेला होता तो ट्रक बेलापूर येथे वजन करण्यासाठी जात असताना पोलीसांना संशय आला या बाबत चालकाकडे विचारणा केली असता त्यास व्यवस्थित माहीती देता आली नाही त्यामुळे पोलीसांनी चौकशी करीता तो ट्रक पोलीस स्टेशनला आणला या बाबत पोलीसांनी चौकशी केली असता हा गहु बि बियाणे महामंडळाकडून उचलला असल्याचे सांगण्यात आले असुन कमी प्रतिचा हा गहु असल्याचे ट्रक चालकाचे म्हणणे आहे हा गहु बिड येथे चालला होता या बाबत बेलापूर पोलीसाकडून चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा येथे हॉटेलच्या कूकचा खून करण्यात आल्याची घटना भेर्डापूर परिसरात रविवारी दुपारी घडली. तालुक्यातील भेर्डापूर-पाथरे रस्त्यावर हॉटेल अजिंक्यतारा आहे. त्याठिकाणी काल दुपारी हॉटेलचा कूक मोहम्मद शेख (वय 71) यांना डोक्यामध्ये जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते जागीच ठार झाले.सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान हे पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे, रवींद्र पवार, सतीश गोरे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. वायकर, काका मोरे, संदीप पवार, रवींद्र शेळके यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेची पाहणी करून पंचनामा केला. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी एका संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ही हॉटेलचे वेटर व कुक यांच्यात झालेल्या अंतर्गत वादातून घडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

औरंगाबाद: कुळाची जमीन परत मिळावी,याकरीता तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपये लाचेची मागणी करून वकिल आणि मदतनिसामार्फत १ लाख रुपये लाच घेताना पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आदर्श तहसीलदार म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सावंत यांचा गौरव झाला होता.अ‍ॅड. कैलास सोपान लिपने पाटील (३८,रा. मित्रनगर) आणि मदतनिस बद्रीनाथ कडुबा भवर (३५, रा.भानुदासनगर)अशी अन्य आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार  तक्रारदार  यांनी पैठण तालुक्यातील पांगरा येथील १२ एकर १४ आर कुळाची जमीन खरेदी केली आहे. कुळाची ही जमीन परत मिळावी, म्हणून मूळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठण तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे दावा दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी होते. या दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि  बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत ३० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.  या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी तक्रारीची पडताळणी केली पंचासमक्ष तहसीलदार सावंत, अ‍ॅड. कैलास लिपने पाटीली आणि बद्रीनाथ भवर यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपये लाचेची मागणी केली. यानंतर आज २९ सप्टेंबर रोजी पैठण तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचला.  यावेळी तहसीलदार सावंत यांनी त्यांच्या कार्यालयातच अ‍ॅड. कैलास लिपने पाटील आणि बद्री यांच्या उपस्थितीत लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून  एक लाख रुपये घेतले. लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, पोलीस उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केली. पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, गोपाल बरंडवाल, रविंद्र अंबेकर आणि संदीप आव्हाळे यांनी त्यांना मदत केली.

बुलढाणा - 29 सितंबर
महाराष्ट्र में होने जा रहे विधानसभा चुनाव की हलचल तेज़ हो गई है.आज काँग्रेस के महासचिव मुकुल वासनिक के हस्ताक्षर से राज्य के 51 विधानसभा निर्वाचन क्षेत्र के लिए 51 उम्मीदवारों के नाम का अधिकृत रूप से एलान किया गया है.हालांकि काँग्रेस छोड़ कर अब तक अन्य किसी भी दल ने अपने प्रत्याशियों के नाम की घोषणा नही की है.घोषित 51 नामो में बुलढाणा जिले के 2 ही निर्वाचन क्षेत्रों की घोषणा की गई है जिसमें बुलढाणा के विद्यमान विधायक हर्षवर्धन सपकाल तथा मेहकर से एड.अनंत वानखेडे का समावेश है.चिखली के विद्यमान विधायक व काँग्रेस के जिलाध्यक्ष राहुल बोन्द्रे का नाम इस पहेली सूची में नही आने के कारण कई प्रकार की चर्चाएं जिले में हो रही है.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget