चिं. विकासच्या धाडसाने चिं. ओमचे वाचले प्राण.


बेलापूर परिसरातील सुभाषवाडी येथील जि. प.प्राथ. शाळेजवळच्या पाण्याने पूर्ण भरलेल्या विहिरीत जे. टी. एस.हायस्कूल,बेलापूर इ.५ वी अ मधील विद्यार्थी चिं. ओम विजय नंदिरे घराजवळ असलेल्या विहिरीत पाय घसरून पडला सदर विद्यार्थ्यास पोहता येत नव्हते.घटना घडत असतांना याच शाळेतील विद्यार्थी चिं. विकास बहिरूनाथ कांबळे(९वी) व चिं. कृष्णा दिलीप नवले(८वी) यांनी पाहिले.
आपल्या प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान व धाडस दाखवून चिं. विकास कांबळे याने विहिरीत उडी घेतली व चिं. ओम नंदिरे यास विहिरीत पाण्यात बुडण्यापासून वाचविले व जीवदान दिले.
त्याच्या या शौर्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.उंडे मॅडम,पर्यवेक्षक श्री.तायडे सर ,वर्गशिक्षक श्री.थोरात सर व सर्व सेवकवृंदानी त्याच्या या धाडसाचे कौतुक करून अभिनंदन केले.
त्याच्या या शौर्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा बाल शौर्य पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget