हिंदी दिनानिमित्त आर्ट,सायन्स,काॅमर्स काॅलेज,कोल्हार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हार : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदी दिनानिमित्त आर्ट,सायन्स,काॅमर्स काॅलेज,कोल्हार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदी राष्ट्रभाषा जनजागृतीसाठी हिंदी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा,वाद-विवाद स्पर्धा व आदी उपक्रम राबविण्यात आले. आर्ट,सायन्स व काॅमर्स काॅलेज कोल्हार हिंदी विभाग यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधे मधे भाग घेतला होता त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह व पुष्प चिन्ह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहय्यक निर्देशक श्री.संजयजी शुक्ला,प्राचार्य एस.एन.शिंगोटे सर,उपप्राचार्या अर्चना विखे,नवले सर,हिंदी विभाग प्रमुख प्रविण तुपे सर,विखे सर,रूद्राक्ष सर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना संजयजी शुक्ला यांनी हिंदी विषयाचे महत्त्व व हिंदी विभागा मधे असणार्या सर्व रोजागारा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख विखे सर यांनी मानले कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी : निखील भोसले
प्रतिनिधी : निखील भोसले