सिल्लोड, प्रतिनिधी : बुधवारी पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा गुरुवारी अग्निशामक दलाचे जवान, महसूल, पोलिस प्रशासन व ग्रामस्थांनी दिवसभर नदीत शोध घेतला. परंतु त्यांना मृतदेह शोधन्यात यश आले नाही. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार किरण कुळकर्णी यांनी दिली.
बुधवारी सकाळी आमठाणा, घाटनांद्रा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पूर्णा नदीला मोठा पूर आला होता. या नदी काठावरील सावखेडा येथील पंडित पांडू गोंगे (32) हा तरुण बोरगाव् बाजार येथे मेडिकल औषध घेण्यासाठी पूर्णा नदीवरील पुलावरुन जात असताना पाय घसरल्याने पाण्यात पडला व पुरात वाहून गेला. त्याचा बराच शोध घेतला. परंतु पाण्याचा ओघ वाढल्याने त्याचा मृतदेह मिळाला नाही.
गुरुवारी नायब तहसीलदार किरण कुळकर्णी, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक विलास आडे, विष्णू पल्हाळ, देवीदास जाधव, मुश्ताक शेख, मंडळ अधिकारी दांडगे, तलाठी, अग्निशामक दलाचे पाच जवान यांच्यासह ग्रामस्थांनी दिवसभर नदीत शोध घेतला. पण त्यांना मृतदेह शोधन्यात यश आले नाही.
बुधवारी सकाळी आमठाणा, चारनेर, केळगाव, अंभई, घाटनांद्रा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने दाणादान उडाली. या पावसामुळे जोत्याखाली असलेला चारनेर- पेंडगाव प्रकल्पासह छोटे- मोठे जलसाठे तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामा सोबत रबी हंगाम येणार असल्याने शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
आमठाणा मंडळात अतिवृष्टी
Post a Comment