आरपीआय आठवले गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन

राहुरी प्रतिनिधी,
राहुरी शहरात त्वरीत ग्रामीण रूग्णालय व्हावे या मागणीसाठी आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालया समोर आरपीआय आठवले गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच त्या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
         गेल्या अनेक वर्षापासून राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. आज पर्यंत विविध संघटनांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र रूग्णालयाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलै २०१९ रोजी प्राणांतीक आमरण उपोषण केले होते. त्यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे, तहसीलदार फसिओद्दीन शेख, बांधकाम अभियंता फुलचंद जाधव, भूमी अभिलेख उप अधिक्षक थोरात यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा करून लवकरच ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देऊन उपोषणा पासून परावृत्त करण्यात आले होते. मात्र दोन महिने उलटल्या नंतरही ग्रामीण रूग्णालयाच्या प्रश्ना बाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे दिनांक १९ सप्टेंबर रोजी आरपीआय चे तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विलास साळवे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी रूग्णालयास मंजूरी दिली. त्याच जागी रूग्णालय होते. या शासनाच्या नियमांची आम्हाला माहिती आहे. नगराध्यक्ष यांच्या कडून आमची दिशाभूल केली जात आहे.
         तसेच ग्रामीण रूग्णालयासाठी आलेला सुमारे १८ कोटीचा निधी पालिकेच्या निष्काळजीपणा मुळे धूळखात पडला आहे. असे अरूण साळवे यांनी सांगून पालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत, पालिका प्रशासनच याला जबाबदार असल्याचे सांगितले.
        यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच ग्रामीण रूग्णालय शहरातच झाले पाहिजे. आम्ही रूग्णालयाची इमारत शहरा बाहेर जाऊ देणार नाही. ग्रामीण रूग्णालय शहरातच झाले पाहिजे, यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. असे परखड मत तनपूरे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रविण लोखंडे यांनी नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे व मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्याशी चर्चा करून रूग्णालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असे सांगितले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget