रामजी नगर ओझर (मिग) येथील अंगणवाडीत पोषण अभियान उपक्रम उत्साहात साजरा

ओझर प्रतिनिधी: एकात्मिक बाल विकास सेवा योजना निफाड २ च्या अंतर्गत येणार्या ओझर येथील रामजी नगर 27516140526 या अंगणवाडी मध्ये पोषण अभियान उपक्रमा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ओझर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री.अनिलजी राठी, आरोग्य सेवक श्री.सुरज हरगोडे, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, ह्या उपस्थित होत्या. या वेळी शिक्षणाची दैवत सावित्रीमाई फुले यांचे प्रतीमेचे पुष्पहार अर्पण करुन व्दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
या वेळी कीशोरीवयीन कु.प्रज्ञा गौतम निकम, कु.भारती अशोक गवारे यांनी अतिषय सुंदर काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाची पाहणी करुन कौतुक करण्यात आले.
या वेळी अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती सुनिताताई निकम व मदतनीस श्रीमती प्रणिता कापडणे यांनी कुपोषण मुक्त भारत या संकल्पनेवर भर देवुन बालकांना विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळे व जंगली भाज्याचे अनेक चवदार पदार्थ बनवून ठेवुन सर्व बालकांना उपस्थितांना चव दीली. या वेळी रांगोळी प्रदर्शनात  "बेटी बचाव बेटी पढाओ"  सामाजिक स्वच्छता, व्यसनमुक्ती, अक्षय पात्र योजना, या संदर्भात सामाजिक प्रबोधन केले.
या वेळी चाळीस बालकांना शाळेच्या पाट्या व पेंन्सिलचे वाटप करण्यात आल्या. उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मा.रविंद्रदादा जाधव यांचे अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने श्रीमती सुनिता यांना शाल, स्मृतिचिन्ह, नारळ, पुष्प देवुन गौरवण्यात आले. तसेच या वेळी कौशल्याबाई जाधव, इंदुबाई गटकळ,  इंदुबाई कोरडे, शारदाबाई जाधव, लताबाई जाधव या पाच जेष्ठ महीलांचा नारळ व गुलाबपुष्पे ब्लाऊजपीस देवुन रविंद्रदादा जाधव व अनिलजी राठी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अंगणवाडी कार्यकर्ती सविता चौधरी, सुनंदा जाधव, सुरेखा म्हैसधुनी, स्थानिक नागरीक माया जाधव, मनिषा जाधव, अंजना जाधव, छाया जाधव, भारती टोंगारे,  आदींसह असंख्य महिला उपस्थित होते. सुत्रसंचालन अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता निकम यांनी केले तल आभार मदतनिस प्रणिता कापडणे यांनी मानले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget