माननीय उपायुक्त श्री प्रसाद सुर्वे तसेच श्री पराग नवलकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर व सी पी निकम उपाधीक्षक अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १९ /०९/२०१९ रोजी पहाटे ०२.०० वाजताच्या सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २श्रीरामपूर व स्टाप यांनी हिंदुस्तान पेट्रोल पंपच्या मागील बाजूस मांजरी शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर याठिकाणी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार स्टाफ सह दारूबंदी गुन्हा याकामी छापा मारला असता विदेशी व देशी मद्याचे ७४ बॉक्स मिळून आले त्याची किंमत अंदाजे ०३,२९,१८४/- रुपयेचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल हस्तगत केला सदर गुन्ह्यात आरोपी नामे अशोक तुकाराम विटनोर यास अटक केली सदर आरोपीविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) ८०(१) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला माननीय न्यायालय राहुरी यांच्यासमोर हजर केले. सदर कारवाई ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पी बी अहिरराव दुय्यम निरीक्षक, के यु छत्रे दुय्यम निरीक्षक , ए सी खाडे दुय्यम निरीक्षक ,नम्रता वाघ दुय्यम निरीक्षक, कॉन्स्टेबल स्टाफ श्री राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे, व महिला जवान वर्षा जाधव यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्रमांक 2 श्रीरामपूर हे करत आहेत
Post a Comment