Latest Post

 ( प्रतिनिधी )जगाच्या घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता असून यासाठी उर्दू शाळेच्या शिक्षकांची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. मुले शिकली पाहिजे ,सुसंस्कृत झाली पाहिजे यासाठी शिक्षक-पालक यांचे प्रयत्न आवश्यक आहेत . आज समाज बोकाळलाय, महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक शाळेने सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले. नगरपालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये पालक व शिक्षक यांच्या लोकवर्गणीतून प्रत्येक वर्गात बसविण्यात आलेल्या डिजिटल एलईडी चे उद्घाटन, नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख यांच्या सहकार्याने शाळेत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे लोकार्पण व नगरपालिकेतर्फे मुलांना दिल्या जाणाऱ्या मोफत गणवेशाचा वितरण कार्यक्रम नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व श्री बहिरट यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटक म्हणून श्री बहिरट बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक ताराचंद रणदिवे होते. यावेळी नगरसेविका जायदाबी कुरेशी, रईस जहागिरदार, कलीम कुरेशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, जलीलभाई काजी, प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे, फिरोज पोपटिया आदी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. बहिरट पुढे म्हणाले कि माता ही मुलांची पहिली शाळा आहे. स्त्रीचे महत्त्व श्रेष्ठ आहे.  नगरपालिकेच्या उर्दू शाळेने सीसीटीव्ही बसवून एक आदर्श निर्माण केला. इतर शाळांनी त्या आदर्शाचं अनुकरण करावं. शाळेत शिकणाऱ्या मुलींची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. आजकाल समाज बोकाळला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, ते पाहून खूप दुःख झाले. तुमची सुरक्षितता पाहणे हे पोलिसांचे काम आहे.  समाजातील विचित्र वागणाऱ्या लोकांना नीट केले पाहिजे. जीवनात दोन कामे कमी करा, पण समाजात चांगले संस्कार करा असे आवाहन त्यांनी केले. शहरांमध्ये सध्या एकूण २९ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून शहरातील दानशूर लोकांनी सहकार्य केल्यास ही संख्या अजून वाढविण्यात येईल असेही ते म्हणाले. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी उर्दू शाळा क्र. ५ च्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक करीत नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक पाच हिचे कार्य नेत्रदीपक असून असेच कार्य सर्व शाळांमधून झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी उर्दू शाळेने आपल्या कामातून इतर शाळांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे असे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण यांनी शाळेच्या समस्या मांडून नगरपालिकेने त्या सोडवाव्यात अशी मागणी केली. यावेळी शाळेला एलईडी टी व्ही साठी देणगी देणारे सरकार किराणाचे शाकीरभाई सय्यद, रईस जहागीरदार , मुन्नाभाई बॅटरीवाले, जलीलभाई काजी, फिरोज पोपटिया, हुजेफ जमादार ,इम्तियाज खान, सलीम जहागिरदार, वहिदा सय्यद, आस्मा पटेल यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकपदी बढती मिळाल्याबद्दल सलीमखान पठाण व परवीन शेख यांचा शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी केले. सूत्रसंचालन आसिफ मुर्तुजा यांनी केले तर फारुक शाह यांनी आभार मानले. कार्यक्रमास शरीफ कुरेशी, फयाज कुरेशी, कासम शाह ,अन्वर आत्तार, अन्सार आत्तार, नजीर आत्तार, जमील शहा, पत्रकार प्रदीप आहेर , अल्ताफ इमाम शेख ,साजिद कुरेशी, अशपाक शहा, इरशाद शेख, रशीद शेख, बदर शेख ,जावेद सर,  रुबीना बाजी आदींसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

श्रीरामपूर | प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सौरभ विठ्ठल कर्डिले वय 18 हा इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा गणेश विसर्जनासाठी येथील प्रवरा नदीपात्रात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली . त्याच्या सोबतच्या तरुणांनी आरडाओरड केली असता स्थानिक युवकांनी नदीत उडी घेऊन शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, बेलापूर आऊट पोस्टचे अतुल लोटके, गणेश भिंगारदिवे यांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत तपास यंत्रणेने सूचना केल्या.श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, कामगार तलाठी गवारी व स्थानिक पत्रकार व ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात तळ ठोकून असून गळ, टायरच्या माध्यमातून तसेच नावेच्या साह्याने शोधकार्य सुरू आहे.



90 कुत्तों की हत्या के आरोप में  पुलिस ने भोकरदन के 5 लोगों को किया गिरफ्तार,नगर परिषद द्वारा चलाई गई थी कुत्ते पकड़ने की मुहिम
बुलढाणा - 12 सितंबर विगत 6 सितंबर को गिराडा जंगल में 80 से 90 मृत कुत्ते पाए जाने के बाद बुलढाणा ग्रामीण पुलिस थाने में अपराध दर्ज होने के बाद 11 सितंबर को पुलिस ने जालना जिले के भोकरदन शहर से 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है जो इन कुत्तों की मौत के कुसूरवार बताए जा रहे हैं.
     घटना इस प्रकार है कि, बुलढाणा तहसील अंतर्गत की ग्राम गिरडा के पास अजंता पर्वत श्रृंखला है जहां घना जंगल और पहाड़ी है. गुरुवार 5 सितंबर की रात में किसी अज्ञात ने वाहन में 80 से 90 मृत कुत्तों को लाद कर जंगल से हो कर गुज़रनेवाले गिरडा-सवलदबारा मार्ग के बाजू में फेंक दिया था. अगले दिन 6 सितंबर को गांव के कुछ लोगों को बदबू आने पर उन्हें इतनी बड़ी संख्या में मृत कुत्ते दिखाई दिए. इस घटना की सूचना वनविभाग को दिए जाने पर वनकर्मी नारखेड़े व तराल सहित पुलिस पाटिल घटना स्थल पर पहोंचे और पंचनामा करने के बाद कुत्तों को ज़मीन में दफना दिया था.इन कुत्तों के पैर मुंह बंधे हुए थे तथा 3-4 कुत्ते जिंदा भी थे जिन पर उपचार कर उन्हें छोड दिया गया. इसी मामले में वनरक्षक के.एन. तराल की शिकायत पर बुलडाणा ग्रामीण पुलिस थाने में अज्ञात आरोपी के खिलाफ एनिमल क्रुएल्टी एक्ट 1960 की विविध धारा और भादवी की धारा 429, 34 तथा महाराष्ट्र पुलिस कानून की धारा 119 के तहत अपराध दर्ज कर पुलिस ने कुत्तों की मौत का कारण जानने के लिए 9 सितंबर को दफनाए हुए कुत्ते बाहर निकाल कर उनका पोस्मार्टम करवाया और "विसरा" जांच के लिए अमरावती की फॉरेंसिक लेब में भेज दिया.
      पुलिस अपनी जांच में जुटी हुई थी तब पता चला कि,बुलढाणा जिले की सीमा से सटे मराठवाडा के जालना जिले के भोकरदन शहर में नगर पालिका द्वारा कुत्ते पकडने की मुहिम चलाई गई थी पश्चात ज़रूरी मालूमात जुटाने के बाद बुलढाणा ग्रामी  के थानेदार मनसूब सातदिवे,सहित पुलिस कर्मी शरद चोपडे, संजय वराडे,संदीप मिसाल व चालक विलास पवार आदि कल 11 सितंबर को भोकरदन पहोंचे जहां से उन्होंने आरोपी वाहन चालक सिद्धेश्वर नामदेव गायकवाड(28),शेख सलीम शेख शौकत(34),मजदूर अनिल वसंत गायकवाड (29),संतोष सीताराम गायकवाड (38) इन चारों को गिरफ्तार किया जबकि कुत्ते पकड़नेवाले ठेकेदार विष्णु सूर्यभान गायकवाड (34) ने बुलढाणा थाने में पहूंचकर आज 12 सितंबर को आत्मसमर्पण किया.प्राथमिक जांच में पता चला कि,भोकरदन में इन आरोपियों द्वारा कुत्तों को फांसे से पकड़ने के बाद उनके पैर और मुंह बांध दिए जाते थे ताकि कुत्ते भोंक ना पाए और इन्हें नगर पालिका के कचरा उठाने के 2 लोडिंग रिक्शा में डाल दिया जाता था.वाहन छोटे होने के कारण एक पर एक कुत्ते भरे जाने से उनकी दम घुटने से मौत हो गई जिन्हें फिर गिरडा के जंगल मे रात के समय ला कर फेंक दिया गया था.पांचो आरोपियों को बुलढाणा कोर्ट में आज पेश किया गया जिन्हें न्यायिक हिरासत में भेज दिया गया है.अब देखना ये है कि,इस मामले में भोकरदन नगर परिषद के अधिकारी-कर्मी आरोपी बनते है या नही? मामले की अधिक जांच में पुलिस जुटी हुई है.

बुलडाणा - 11 सप्टेंबर
आज संध्याकाळी बुलडाणा तालुक्यातील बऱ्याच भागात झालेल्या जोरदार पाऊसा मुळे पैनगंगा नदीला पुर आला असून आगोदरच 100 टक्के भरलेला येळगांव धरण ओवरफ्लो झाला असून बुलडाणा-चिखल हा मागील 1 तासा पासून बंद असून या पुराच्या पाण्यात 2 वाहन अडकले होते त्यात असलेले 6 लोकांना महसूल विभागाने सुखरूप बाहेर काढल्याची माहिती येळगांवचे तलाठी झगरे यांनी दिली आहे तर त्यांचे वाहन सद्या पाण्यात अडकलेले आहे.
येळगांवचा पाणी खाली पेनटाकली धरण मध्ये मोठ्या प्रमाणात जात आहे,हा धरण 90 टक्के पेक्षा जास्त भरलेला असल्याने त्याचे 9 दरवाजे उघड़ण्यात आले आहे व नदी काठच्या गावांना सतरकतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पैनगंगेला आलेल्या पूरा मुळे बुलडाणा-अजिंठा,बुलडाणा-धाड,बुलडाणा-रायपुर व बुलडाणा-चिखली असे ऐकून 4 मुख्य मार्ग बंद पडलेले आहे.या संपूर्ण परिस्तिथिवर जिल्हा प्रशासन लक्ष देऊन आहे.

अब्दुल सत्तार यांच्या रूपाने शिवसेनेला लोकाभिमुख नेतृत्व मिळाले - आमदार अंबादास दानवे

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.11, सिल्लोड मतदारसंघात प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे सिल्लोड मतदार संघातील शिवसैनिकांना मागे रहावे लागले. 20 वर्षानंतर आज जुने शिवसैनिक एकत्र पाहून आनंद व्यक्त होत आहे. सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील शिवसैनिकांचे आता प्रकाश पर्व सुरू झाले असून समाजबांधवांना घेवून चालणारा , तसेच केवळ मतदार संघच नव्हे तर मराठवाडा आणि राज्याला माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने शिवसेनेला एक सक्षम व लोकाभिमुख नेतृत्व मिळाले असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित  विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी केले.

मंगळवार ( दि.10 ) रोजी सिल्लोड शिवसैनिकांच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालयात आमदार अंबादास दानवे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते दानवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार दानवे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास संबोधित करतांना उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की,
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने सिल्लोड - सोयगाव मतदारसंघासह जिल्हाभरात युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारसंघात युवा शिवसेनेची एक मजबूत फळी निर्मान झाली असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिक मोलाची भूमिका निभावेल असा विश्वास अब्दुल समीर यावेळी व्यक्त केला.

        कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना जिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, किसान सेनेचे तालुका प्रमुख सोमनाथ बडक, बाजार समितीचे संचालक दामुअन्न गव्हाणे, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, कौतिक मोरे, महेंद्र बावस्कर, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रघुनाथ घरमोडे, शहर उपप्रमुख रवी रासने, रामेशवर जंजाळ, नगरसेवक सुनील दुधे, मतीन देशमुख ,विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, अकील वसईकर, सुधाकर पाटील, रईस मुजावर, शंकरराव खांडवे,  प्रशांत क्षीरसागर ,राजू गौर, श्रावण गिरी, जगदीश नारळे, कैलास जाधव, सुभाष करवंदे, संतोष धाडगे, किरण देवळे, राहुल नवल, सुखदेव सपकाळ, सुभाष नवल, गजानन बावस्कर, शिवाजी फरकडे, नारायण आहेर, भास्कर आहेर, रवी काळे, शिवा गौर आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बुलडाणा - 11 सप्टेंबर
बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथील जंगलात 5 सप्टेंबर 2019 रोजी सुमारे 80 ते 90 कुत्र्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. त्यामध्ये पाय बांधलेल्या स्थितीत चार जिवंत कुत्र्यांचा समावेश होता. परीसरातील नागरिकांना आरोग्यास अपाय होवू नये म्हणून वन विभागाने पंचनामा करून मृत कुत्र्यांचे मृतदेह जेसीबी द्वारे खड्डा खोदून पुरण्यात आले व विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर वन विभागाने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेल्या तक्रारी नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागास दिलेल्या पत्रानुसार मृत कुत्र्यांपैकी चार कुत्र्यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, पाडळी यांनी 8 सप्टेंबर 2019 रोजी उती नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, अमरावती यांच्याकडे पाठविले.
     याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेत जिल्हा प्राणी क्लेश समितीची सभा आज 11 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर समितीमध्ये 8 शासकीय पदसिद्ध व 13 अशासकीय सदस्य आहेत. उपस्थित सदस्यांनी या प्रकरणात कुत्र्यांची क्रुरतेने व निर्दयतेने हत्या करून प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये कलमांचे उल्लंघन करून भारतीय दंड संहिता कलम 429 नुसार 5 वर्षपर्यंत कारावास व दंडाची तरतूद लक्षात घेता पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीविरूद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
     जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोकाट जनावरे / कुत्रे यांचा बंदोबस्त स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन शिबिरे घेण्यात यावीत. भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी निर्बिजीकरण शिबिरे घेवून यामध्ये आरोग्य तपासणी करून रोग प्रतिबंधक लसीकरणसुद्धा करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांनी दिल्या. यावेळी समिती सदस्य उपस्थित होते, असे पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शिर्डी प्रतिनिधी शिर्डीत येथिल प्रसिद्द असलेल्या चीन्नाराव याच्या होटेल वर क्लब चालु असल्याचि ख़बर अप्पर पोलिस अधीक्षक सौ काळे मँडम यान्ना गुप्त बातमी भेटल्याने त्यांनी शिर्डीत राज़रोस चालत असलेल्या हया क्लबवर छापा टाकुन आरोपिन्ना गज़आड़ केले ज़र शिर्डीत चालत असलेले अवैद्य धंध्यांचि माहिती ही अप्पर पोलिस अधिक्षाकांना भेटते तर शिर्डी चे पोलिस काय झोपले आहेत काय शिर्डी पोलीसाँच्याच आशिर्वादाने तर हे चालु नाहीत ना? अशी चर्चा सध्या शिर्डीत चालु आहें .
 अप्पर पोलिस अधिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आसुन  शिर्डी ही साइबाबांच्या पावन स्पर्शाने पावन झालेलि भूमि आहें ह्या पावन भूमित दारू मटका ज़ुगार वेश्या व्यवसाय अशे अनेक अवैद्य व्यवसाय राजरोस पणे चालु आहेत त्याला ही क़ूठे तरी लगाम बसावि म्हनुण अप्पर पोलिस अधिक्षक यांनी तशे प्रयत्न करावे महंजे शिर्डी चे पवित्र अबाधित राहिल ही साईभक्तांचि मागनी आहें

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget