गिरडा कुत्रे मृत्यू प्रकरणी जिल्हा प्राणी क्लेश समितीची बैठक संपन्न,समितीने घेतली प्रकरणाची गंभीर दखल

बुलडाणा - 11 सप्टेंबर
बुलडाणा तालुक्यातील गिरडा येथील जंगलात 5 सप्टेंबर 2019 रोजी सुमारे 80 ते 90 कुत्र्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. त्यामध्ये पाय बांधलेल्या स्थितीत चार जिवंत कुत्र्यांचा समावेश होता. परीसरातील नागरिकांना आरोग्यास अपाय होवू नये म्हणून वन विभागाने पंचनामा करून मृत कुत्र्यांचे मृतदेह जेसीबी द्वारे खड्डा खोदून पुरण्यात आले व विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर वन विभागाने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेल्या तक्रारी नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागास दिलेल्या पत्रानुसार मृत कुत्र्यांपैकी चार कुत्र्यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, पाडळी यांनी 8 सप्टेंबर 2019 रोजी उती नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, अमरावती यांच्याकडे पाठविले.
     याबाबत जिल्हा प्रशासनाने दखल घेत जिल्हा प्राणी क्लेश समितीची सभा आज 11 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर समितीमध्ये 8 शासकीय पदसिद्ध व 13 अशासकीय सदस्य आहेत. उपस्थित सदस्यांनी या प्रकरणात कुत्र्यांची क्रुरतेने व निर्दयतेने हत्या करून प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये कलमांचे उल्लंघन करून भारतीय दंड संहिता कलम 429 नुसार 5 वर्षपर्यंत कारावास व दंडाची तरतूद लक्षात घेता पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीविरूद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
     जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोकाट जनावरे / कुत्रे यांचा बंदोबस्त स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन शिबिरे घेण्यात यावीत. भटक्या कुत्र्यांची पैदास रोखण्यासाठी निर्बिजीकरण शिबिरे घेवून यामध्ये आरोग्य तपासणी करून रोग प्रतिबंधक लसीकरणसुद्धा करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांनी दिल्या. यावेळी समिती सदस्य उपस्थित होते, असे पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget