सिल्लोड शिवसेनेच्या वतीने आमदार दानवे यांचा सत्कार

अब्दुल सत्तार यांच्या रूपाने शिवसेनेला लोकाभिमुख नेतृत्व मिळाले - आमदार अंबादास दानवे

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.11, सिल्लोड मतदारसंघात प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे सिल्लोड मतदार संघातील शिवसैनिकांना मागे रहावे लागले. 20 वर्षानंतर आज जुने शिवसैनिक एकत्र पाहून आनंद व्यक्त होत आहे. सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातील शिवसैनिकांचे आता प्रकाश पर्व सुरू झाले असून समाजबांधवांना घेवून चालणारा , तसेच केवळ मतदार संघच नव्हे तर मराठवाडा आणि राज्याला माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या रूपाने शिवसेनेला एक सक्षम व लोकाभिमुख नेतृत्व मिळाले असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित  विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांनी केले.

मंगळवार ( दि.10 ) रोजी सिल्लोड शिवसैनिकांच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालयात आमदार अंबादास दानवे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते दानवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार दानवे बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास संबोधित करतांना उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की,
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने सिल्लोड - सोयगाव मतदारसंघासह जिल्हाभरात युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारसंघात युवा शिवसेनेची एक मजबूत फळी निर्मान झाली असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत शिवसैनिक मोलाची भूमिका निभावेल असा विश्वास अब्दुल समीर यावेळी व्यक्त केला.

        कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना जिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, किसान सेनेचे तालुका प्रमुख सोमनाथ बडक, बाजार समितीचे संचालक दामुअन्न गव्हाणे, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, कौतिक मोरे, महेंद्र बावस्कर, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रघुनाथ घरमोडे, शहर उपप्रमुख रवी रासने, रामेशवर जंजाळ, नगरसेवक सुनील दुधे, मतीन देशमुख ,विठ्ठल सपकाळ, मनोज झंवर, अकील वसईकर, सुधाकर पाटील, रईस मुजावर, शंकरराव खांडवे,  प्रशांत क्षीरसागर ,राजू गौर, श्रावण गिरी, जगदीश नारळे, कैलास जाधव, सुभाष करवंदे, संतोष धाडगे, किरण देवळे, राहुल नवल, सुखदेव सपकाळ, सुभाष नवल, गजानन बावस्कर, शिवाजी फरकडे, नारायण आहेर, भास्कर आहेर, रवी काळे, शिवा गौर आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget