श्रीरामपूर | प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील सौरभ विठ्ठल कर्डिले वय 18 हा इयत्ता बारावीत शिकणारा मुलगा गणेश विसर्जनासाठी येथील प्रवरा नदीपात्रात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली . त्याच्या सोबतच्या तरुणांनी आरडाओरड केली असता स्थानिक युवकांनी नदीत उडी घेऊन शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.घटनास्थळी डीवायएसपी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, बेलापूर आऊट पोस्टचे अतुल लोटके, गणेश भिंगारदिवे यांनी तातडीने घटनस्थळी दाखल होत तपास यंत्रणेने सूचना केल्या.श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील, कामगार तलाठी गवारी व स्थानिक पत्रकार व ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात तळ ठोकून असून गळ, टायरच्या माध्यमातून तसेच नावेच्या साह्याने शोधकार्य सुरू आहे.
Post a Comment