LCB वर गंभीर आरोप! पत्रकार संघटनेचा थेट तक्रार अर्ज ,अवैध धंदे, भंगार व्यवहार आणि काही अधिकाऱ्यांचा अतिरेक!
पत्रकार संघटनेने या संदर्भात स्पष्ट म्हटलं आहे की —
“LCB चे काम गुन्हे उघड करणं आहे; पण काही ठिकाणी गुन्हेगारांचं रक्षण करणं दिसतंय. हा विभाग जनतेसाठी भयावह नव्हे, सुरक्षिततेचा आधार व्हायला हवा.”
यासोबतच तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरेक आणि दबावाच्या वागणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नमूद आहे.
पत्रकार संघटनेच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा ठळक करण्यात आला आहे —
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं धोरण राबवलं होतं, पण अलीकडे पुन्हा त्याच धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पत्रकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती राबविण्याची मागणी केली आहे.







