Latest Post

अहमदनगर  - (प्रतिनिधी ), लोणी येथे आढळलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासातच आरोपींचा छडा लावून दोन आरोपींना अटकही केले आहे                                         या बाबत हकीकत अशी की  दिनांक 30 जुलै रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगलगांव शिवार, लोणी, ता. राहाता येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी अंदाजे 45 ते 55 वर्षे वयाचे पुरुषाचे छातीवर कोणत्यातरी हत्याराने भोसकुन खुन केला. सदर घटने बाबत लोणी पोलीस स्टेशनचे पोना/निलेश मुक्ताजी धादवड यांचे तक्रारी वरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2023 भादविक 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयारा करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. 

त्या आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक   दिनेश आहेर यांनी पोलीस साब इन्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड काँन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर खुनाचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले त्या आधारे पथकाने आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 29 जुलै  रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर नंबर 135/2023 मधील मिसिंग व्यक्ती श्री. विठ्ठल नारायण भोर वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर हे बेपत्ता असले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणे बाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार नामे स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. सेंधवा, मध्यप्रदेश येथे जावुन आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मनोज वासुमल मोतीयानी, वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर व 2) स्वामी प्रकाश गोसावी वय 28, रा. सावेडीगांव, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.

त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दिनांक 29/07/23 रोजी माझी पांढरे रंगाची हुंडाई आय-20 कार मधुन जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार नामे स्वामी गोसावी याचे मदतीने मयताचे छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व मयताचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले बबत माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे. 


आरोपी नामे मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -6 गुन्हे दाखल आहेत 

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

एकाच कुटुंबातील दोन मुले शासकीय सेवेत पोहोचविण्याचा मान देसाई परिवाराने मिळवीला असुन अनिरुद्ध देसाई हा बिड येथे सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवा देत आहे तर दुसरा अभिषेक देसाई हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून सेवा देत आहे त्या बद्दल राज्याचे महसुल, पशुसंवर्धन तथा दुग्ध विकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचे वडील जेष्ठ पत्रकार देविदास देसाई व आई सौ प्रतिभा देसाई यांचा सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे ,जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र  साळवी ,उपसरपंच अभिषेक खंडागळे आदि मान्यवर.

केंद्र सरकारच्या  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२६ कोटींची योजना बेलापूर (वार्ताहर) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बेलापुर बुद्रुक - ऐनतपुर येथील १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ उद्या रविवार दि.३० रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच तसेच श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक पा. खंडागळे यांनी दिली.

 या प्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पा., आ. लहू कानडे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जि. प. सदस्य शरद नवले, ज्येष्ठ भाजप नेते सुनिल मुथा, पं.स. चे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अधीक्षक अभियंता एस. एम. कदम, कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनील हरदास, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 जि.प.सदस्य शरद नवले यांच्या अधिपत्याखालील श्रीरामपूर रस्त्यावर सद्गुरु मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन सर्वश्री सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी एम. बी. गायकवाड, ग्रा. पं. सदस्या सौ. तबस्सुम बागवान, स्वाती अमोलीक, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, मिना साळवी, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, वैभव कू-हे, सौ . रंजना बोरुडे, शिला पोळ, छाया निंबाळकर, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक आदींनी केले आहे.

खंडाळा (गौरव डेंगळे): श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे सद्गुरु गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी व चित्रंजनवाडी यांच्या पुढाकाराने अधिक-श्रावण मासानिमित्ताने दिनांक २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

७ दिवस चालणाऱ्या श्रीमद भागवत कथा भागवताचार्य ह भ प बाबा महाराज सासणे (श्री क्षेत्र उक्कलगाव) यांच्या संगीत सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे. तर व्यासपीठाचे नेतृत्व ह भ प श्रीधर घाडगे महाराज, हरिपाठ नेतृत्व ह भ प योगीराज गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी खंडाळा, समस्त ग्रामस्थ खंडाळा, जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ, राजनखोल,जय बजरंग भजनी मंडळ,नांदूर यांच्या अधिपत्याखाली संपन्न होईल.तर रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह भ प दत्तात्रय महाराज रक्टे (माऊली आश्रम, देवगाव संगमनेर) यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. रोज सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ तर सायंकाळी ८ ते १० या वेळेत श्रीमद ् भागवत कथेचा आनंद स्रोत यांना घेता येईल. तरी जास्तीत जास्त गावकऱ्यांनी, वारकऱ्यांनी या अधिक श्रावण मासातील श्रीमद् भागवत कथेचा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहान श्रीमद योगीराज गंगागिरी महाराज भजनी मंडळ नेहरूवाडी व चित्रंजनवाडी,खंडाळा यांनी केले आहे.

श्रीरामपूर: दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी सोमैय्या विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल,कोपरगाव येथे स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जवळजवळ ४३ शाळांच्या ८६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 
      त्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम अकॅडमी शाळेच्या इयत्ता १० वीची विद्यार्थीनी ऋत्वि शरद पाटील व इयत्ता ८ वीचा विद्यार्थी नमिश परेश अग्रवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या जयश्री पोटघन व विषय शिक्षिका प्रियांका सबनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे, सचिव जन्मेजय टेकावडे,गव्हर्निंग काऊन्सिल सर्व सदस्य, ऍडव्हायझरी कमिटीचे सर्व सदस्य व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

👉 राज्यभरातून ८६ स्पर्धकांचा सहभाग! कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:

सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे तिसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ४३ शाळेतील ८६ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेले प्राध्यापक संतोष पद्माकर पवार,रावबहादुर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर यांची उपस्थिती लाभली. बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगळे ही या स्पर्धेसाठी उपस्थित होते.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य के.एल.वाकचौरे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले होते.श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कुमारी ईश्वरी आव्हाड व प्रथमेश पाटील या विद्यार्थ्यांसोबतच सर्व यशस्वी स्पर्धकांचे शालेय व्यवस्थापन व सर्व कर्मचारी वृंद यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ७,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

श्रीराम अकॅडमी,श्रीरामपूर

₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल,अकोले ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज शिर्डी.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

बागलाण एज्युकेशन सोसायटी चे इंग्लिश मीडियम स्कूल सटाणा.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन चे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल नगर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपुर प्रतिनिधी-संविधान बचाव समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यान करीता श्री. ॳॅड, असीम सरोदे साहेब व जेष्ठ विधीतज्ञ मा. ना. सुप्रीम कोर्ट तसेच आर्किटेक्ट श्री, अर्शद  शेख थोर विचारवंत अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम हे

प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं मंगल कार्यालय श्रीरामपूर   येथे दिनांक २४/०७/२०२३ सोमवार रोजी दुपारी २-०० वाजता आयोजित करण्यात आले आहे

तरी शहरातील सर्व नागरिकांनी व तमाम समाज बांधवांनी विद्यार्थी तसेच पालक वर्गांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती संविधान बचाव समितीच्या वतीने करण्यात आली आहे 

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget