केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १२६ कोटींची योजना बेलापूर (वार्ताहर) केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बेलापुर बुद्रुक - ऐनतपुर येथील १२६ कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ उद्या रविवार दि.३० रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती जि प सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच तसेच श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती अभिषेक पा. खंडागळे यांनी दिली.
या प्रसंगी खा. डॉ. सुजय विखे पा., आ. लहू कानडे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पटारे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जि. प. सदस्य शरद नवले, ज्येष्ठ भाजप नेते सुनिल मुथा, पं.स. चे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, अधीक्षक अभियंता एस. एम. कदम, कार्यकारी अभियंता एस. आर. वारे, उपअभियंता भिमगिरी कांबळे, शाखा अभियंता सुनील हरदास, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जि.प.सदस्य शरद नवले यांच्या अधिपत्याखालील श्रीरामपूर रस्त्यावर सद्गुरु मंगल कार्यालय येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन सर्वश्री सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी एम. बी. गायकवाड, ग्रा. पं. सदस्या सौ. तबस्सुम बागवान, स्वाती अमोलीक, प्रियंका कुऱ्हे, उज्वला कुताळ, मिना साळवी, चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख, वैभव कू-हे, सौ . रंजना बोरुडे, शिला पोळ, छाया निंबाळकर, रविंद्र खटोड, भरत साळुंके, रमेश अमोलिक आदींनी केले आहे.
Post a Comment