नेहरूवाडी,खंडाळा येथे श्रीमद् भागवत कथा व अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ.

खंडाळा (गौरव डेंगळे): श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे सद्गुरु गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी व चित्रंजनवाडी यांच्या पुढाकाराने अधिक-श्रावण मासानिमित्ताने दिनांक २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

७ दिवस चालणाऱ्या श्रीमद भागवत कथा भागवताचार्य ह भ प बाबा महाराज सासणे (श्री क्षेत्र उक्कलगाव) यांच्या संगीत सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे. तर व्यासपीठाचे नेतृत्व ह भ प श्रीधर घाडगे महाराज, हरिपाठ नेतृत्व ह भ प योगीराज गंगागीर महाराज भजनी मंडळ, नेहरूवाडी खंडाळा, समस्त ग्रामस्थ खंडाळा, जगद्गुरु तुकाराम महाराज भजनी मंडळ, राजनखोल,जय बजरंग भजनी मंडळ,नांदूर यांच्या अधिपत्याखाली संपन्न होईल.तर रविवार दिनांक ३० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह भ प दत्तात्रय महाराज रक्टे (माऊली आश्रम, देवगाव संगमनेर) यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. रोज सकाळी ५ ते ६ काकडा, सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ तर सायंकाळी ८ ते १० या वेळेत श्रीमद ् भागवत कथेचा आनंद स्रोत यांना घेता येईल. तरी जास्तीत जास्त गावकऱ्यांनी, वारकऱ्यांनी या अधिक श्रावण मासातील श्रीमद् भागवत कथेचा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवहान श्रीमद योगीराज गंगागिरी महाराज भजनी मंडळ नेहरूवाडी व चित्रंजनवाडी,खंडाळा यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget