श्रीरामपूर: दिनांक २२ व २३ जुलै २०२३ रोजी सोमैय्या विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल,कोपरगाव येथे स्वातंत्र्यसंग्रामाचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जवळजवळ ४३ शाळांच्या ८६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
त्यात श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम अकॅडमी शाळेच्या इयत्ता १० वीची विद्यार्थीनी ऋत्वि शरद पाटील व इयत्ता ८ वीचा विद्यार्थी नमिश परेश अग्रवाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या जयश्री पोटघन व विषय शिक्षिका प्रियांका सबनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिकेचे संस्थेचे अध्यक्ष राम टेकावडे, सचिव जन्मेजय टेकावडे,गव्हर्निंग काऊन्सिल सर्व सदस्य, ऍडव्हायझरी कमिटीचे सर्व सदस्य व शिक्षकवृंदानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
Post a Comment