लोणी येथील खुन प्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

अहमदनगर  - (प्रतिनिधी ), लोणी येथे आढळलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता अहमदनगर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या काही तासातच आरोपींचा छडा लावून दोन आरोपींना अटकही केले आहे                                         या बाबत हकीकत अशी की  दिनांक 30 जुलै रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगलगांव शिवार, लोणी, ता. राहाता येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी अंदाजे 45 ते 55 वर्षे वयाचे पुरुषाचे छातीवर कोणत्यातरी हत्याराने भोसकुन खुन केला. सदर घटने बाबत लोणी पोलीस स्टेशनचे पोना/निलेश मुक्ताजी धादवड यांचे तक्रारी वरुन लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 445/2023 भादविक 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयारा करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. 

त्या आदेशा प्रमाणे पोलीस निरीक्षक   दिनेश आहेर यांनी पोलीस साब इन्पेक्टर सोपान गोरे, पोलीस हेड काँन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार,देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर खुनाचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् दिसुन आले त्या आधारे पथकाने आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तात्रिंक विश्लेषणाचे आधारे पुढील तपास सुरु केला. पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसुन आली पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना दिनांक 29 जुलै  रोजी तोफखाना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर नंबर 135/2023 मधील मिसिंग व्यक्ती श्री. विठ्ठल नारायण भोर वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर हे बेपत्ता असले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर मिसिंगमधील व्यक्ती व अनोळखी मयत इसम यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन मिसिंग इसमाबाबत सविस्तर माहिती घेणे बाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग इसम नामे विठ्ठल भोर यांचे बाबत माहिती घेत असताना त्याचे मनोज मोतीयानी यांचे बरोबर प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दोघामध्ये वाद झाले असले बाबत माहिती मिळाली. 

सदर महितीचे अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, अहमदनगर याचा शोध घेतला परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कार मधुन त्याचा साथीदार नामे स्वामी गोसावी यास सोबत घेवुन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. सेंधवा, मध्यप्रदेश येथे जावुन आरोपींचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मनोज वासुमल मोतीयानी, वय 33, रा. सावेडीगांव, अहमदनगर व 2) स्वामी प्रकाश गोसावी वय 28, रा. सावेडीगांव, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.

त्यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांचे प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार असुन त्यावरुन दिनांक 29/07/23 रोजी माझी पांढरे रंगाची हुंडाई आय-20 कार मधुन जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार नामे स्वामी गोसावी याचे मदतीने मयताचे छातीवर स्क्रुड्रायव्हरने वार करुन त्याचा खुन केला व मयताचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपा जवळ फेकुन दिले बबत माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे. 


आरोपी नामे मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळुन नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे व जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -6 गुन्हे दाखल आहेत 

सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget