Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी-नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मास्टर स्पर्धेत अहमदनगर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून नगर पोलिसांचा झेंडा उंच फडकविला. या क्रीडा पोलिसांचे अहमदनगर पोलीस दलातून मोठे कौतुक होत आहे.

औरंगाबाद येथे राज्य अजिंक्य पद मास्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत पोलीस दलातील अनेक संघ व पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे आणि पोलीस हवलदार अनवर अली सय्यद यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या पूर्वतयारीत अनवर अली सय्यद आणि अर्चना काळे यांनी अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात मोठे परिश्रम करून सराव केला होता. या स्पर्धेत जाताना त्यांचे क्रीडाशिक्षक यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुभेच्छा देऊन या दोन्ही खेळाडूंना दिले होते.

 पोलीस हवालदार अन्वरअली सय्यदअली सय्यद यांनी 900 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच लांब उडी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. आणि शंभर मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.  तसेच महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी 100 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदक मिळविले. त्याचबरोबर 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. आणि 400 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक वर येऊन सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. या दोन्ही क्रीडा पोलिसांनी औरंगाबाद येथील  क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वर्षाव करून अहमदनगर पोलिस दलाची मान उंचावली. या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकूण सहा सुवर्णपदक मिळवल्याने पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला व आगामी स्पर्धेतही अशीच सुवर्ण कामगिरी करून पोलीस दलाचे नाव उंच करून पोलीस दलाची शान राखावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

बेलापुरातील गावकरी पतसंस्थेचे संचालक सामाजिक कार्यकर्ते महेश कुऱ्हे  यांचा वाढदिवस बेलापुरातील पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते बिनधास्त न्यूज व तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजीज शेख भाऊसाहेब वाघमारे उपस्थित होते राज्याचे महसुल व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कुऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

बेलापुर  (प्रतिनिधी  )-रासायनिक खताच्या अती वापरामुळे आपले पोषण करणाऱ्या मातीतील जिवाणू लोप पावत चालले असुन माती जिवंत, सजिव ठेवावयाची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असुन माता गोमाता व माती यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी व्यक्त केले                   श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील पुरुषोत्तम आण्णासाहेब थोरात यांच्या गाय गोठ्यास त्यांनी भेट दिली त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राम मुखेकर पुढे म्हणाले की  माता-पिता ,गोमाता , व माती या सर्वांचे रक्षण करण्याची, काळजी घेण्याची वेळ आलेली आहे माता-पित्यांची काळजी न घेतल्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची सख्या वाढत आहे हे आपले दुर्दैव आहे गोमातेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे शेतकरी बंधुंचा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे लंपीसारख्या आजाराने पशुधन धोक्यात आलेले आहे रासायनिक खते वापरुन पिकवीलेले अन्न आपण खात असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे आपल्याला सकस आहार न मिळणे हेच आजाराचे मुख्य कारण आहे तेच पिकांच्याही बाबतीत होत आहे पिकात असलेल्या कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे कमजोरीवर उपाय करण्या ऐवजी आपण रोगावरच मोठ्या प्रमाणात खर्च करतो परिणामी खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था होते त्यामुळे पिकाला, झाडाला सशक्त मजबुत बनवायचे असेल तर भरपुर पोषण द्या पिकाला भरपुर पोषण दिले तर रोगच येणार नाही रासायनिक खताचा वापर टाळा सेंद्रिय शेती करा उत्पन्नही जोमदार निघेल पिकविणारा अन खाणारा दोघेही समाधानी राहील असेही ते म्हणाले या वेळी ब्राम्हणगाव भांड येथील शेतकरी सुरेश वारुळे यांनी सेंद्रिय शेतीचे काय फायदे होतात याचे अनुभव सांगितले  या वेळी शेखर वाकचौरे वरुण तुवर विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव देवराम वाबळे  सौरभ उगले अमित घोडके उमेश मुखेकर प्रविण आहेर सदाशिव कोळसे अक्षय खरात इश्वर दरंदले प्रतापराव पटारे ज्ञानदेव थोरात नवनाथ गडाख विठ्ठल बोठे शंकर थोरात आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर शेतकरी संघटनेचे प्रकाश आण्णासाहेब थोरात यांनी आभार मानले

नागपुर ,श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्या संदर्भात विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले                                        स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी तातडीने 4 जी मशिन देण्यात यावी एनआयसीच्या कामकाजात सुधारणा करण्यात यावी आदीसह विविध मागण्या संदर्भात आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवुन निवेदन दिले                   महाराष्ट्र  एकुण ५५ हजार स्वस्त धान्य दुकाने असुन दुकानदारांना कमी प्रमाणात कमीशन मिळत असल्यामुळे  दुकानदारांच्या कमीशनमध्ये वाढ करण्यात यावी अनेक वेळा नेट अभावी दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते त्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होते म्हणून दुकानदारांना 4 जी मशिन देण्यात यावे पाँज मशिनला सुविधा पुरविणाऱ्या एनआयसीच्या कामकाजात सुधारणा व्हावी कुठलेच धान्य वेळेवर मिळत नाही त्यामुळे त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याला मिळावे मोफत धान्य वाटपाचे कमीशन तातडीने वर्ग करण्यात यावे आवश्यक त्या ठिकाणी केरोसीन वितरण सुरु करण्यात यावे आयएसओ मानांकनाची सक्ती करण्यात येवु नये अशा मागण्याचे निवेदन आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनच्या वतीने राज्याचे अध्यक्ष गणपतराव डोळसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले या वेळी विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर  आमदार सरोज अहीरे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष गणपतराव डोळसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे नागपुर विभागीय अध्यक्ष संजय पाटील नांदेंड जिल्हाध्यक्ष अशोकराव ऐडके नागपुर शहराध्यक्ष सुभाष मुसळे वर्धा जिल्हाध्यक्ष संजय देशमुख हिंगोली जिल्हाध्यक्ष भिकुबाई मोहीते नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे शाहु गायकवाड धर्मराज चौधरी अरुण बागडे इगतपुरी गोपी मोरे दिंडोरी सुदाम पवार देविदास पगारे दशरथ मेधने कैलास मोखनळ राहुल गायकवाड अमोल धात्रक केशव भुसारे नितीन शार्दुल प्रकाश पगार रवी माळगावे भास्कर पताडे आदि पदाधिकारी उपस्थित होते

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली  बांधकाम अभियंता व मर्जीतील ठेकेदार यांना कामे वाटप केले व अर्थिक संगणमत करून सन २०२१-२०२२  मध्ये पूर्ण केलेल्या व चालू असलेल्या  ,व गेली आठ दिवसात पूर्ण झालेल्या विविध रस्त्यांच्या विकास कामामध्ये केलेली कार्यालय अनियमितता गैरप्रकार व झालेले चालू असलेले रस्ते निकृष्ट थातूरमातूर कामे करून टक्केवारी घेऊन बिले  काढले व झालेल्या सर्व कामे थातूर-मातूर  निकृष्ट  खडी व अल्प प्रमाणात डांबर  वापरून शहरातील अनेक रस्त्यांची कामे केली  सदरील उपोषण अर्जात नमूद कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही  करण्याच्या  मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने  नगरपरिषद श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास दि.२७/१२/०२२ रोजी सुरुवात झाली आहे.

      वरील अर्जात नमूद कालावधीमधील झालेल्या व चालू असलेल्या व दहा बारा दिवसांमध्ये गेल्या  नामदार विखेंच्या हातसे उद्घाटन झालेल्या व केलेल्या कामांची सखोल चौकशी होऊन संबंधित  व कामावर वापरलेल्या मटेरियल ची उच्चस्तरीय सूक्ष्म चौकशी करून  कार्यवाही साठी व संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी व काम करणारे निकृष्ट थातूरमातूर काम करणारे ठेकेदार  यांना  काळया यादीत टाकावे व त्यांनी केलेले काम व कामापोटी काढलेल्या व काढण्याच्या तयारीत असलेली सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव   हनिफ भाई पठाण, जिल्हाध्यक्ष -रज्जाक भाई शेख ,जिल्हा संघटक- राजेंद्र त्रिभुवन  आदी  लहुजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास बसले आहे.

श्रीरामपूर : गावं तसं चांगलं पण काही लोकांमुळे भंगल,अशी परिस्थिती,तालुक्यातील एकलहारे ग्रामपंचायतीची झाली आहे. याठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराने, येथील नागरिकांसाठी आलेले स्वस्त धान्य, काळ्या बाजारात विक्रीस पाठवत असतांना. गावातील काही महिलांनी, टेम्पो आडवून. रेशनचा गहू तांदूळ कुठं चालवले याची विचारपूस केली. मात्र रेशनदुकानदार एस के मस्के यांच्या नावावर असलेल्या,स्वस्त धान्य दुकान चालकाने अरेरावी करत. रेशनचे धान्याने भरलेला टेम्पो काढुन दिला. यासंदर्भात ग्रामस्थांनी  तक्रार केल्याने, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच व ५ पंचांसह, सायंकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास, रेशनचे धान्य दुकान सील केले. कारवाईच्या भीतीपोटी रेशन दुकान चालकाने, काळ्या बाजारात पाठवलेले गहू तांदूळ,बारदाने बदललेल्या अवस्थेत,   अधिकाऱ्यांनी सील केलेलं कुलूप उघडून, काळ्या बाजारात नेलेले गहू तांदूळ परत आणले. मात्र ग्रामस्थानी त्यास विरोध करून. पुरवठा अधिकारी व तलाठी यांना बोलावून, रेशन दुकानाचा पंचनामा करून. संबंधित रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल केला असून. गरिबांच्या तोंडचे अन्न चोरून नेणाऱ्या, स्वस्त धान्य दुकान चालक राहुल पगारे याच्या विरुद्ध,कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात, पुरवठा निरीक्षक

सुहास पुजारी यांच्या फिर्यादीवरून, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे  कलम ३ ,७ अन्वये स्वस्त धान्य दुकान चालक शांताबाई कारभारी म्हस्के - पगारे हिच्या विरुद्ध, गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस कारवाईत, स्वस्त धान्याने भरलेल्या १५ पोती ताब्यात घेण्यात आली असून. या प्रकरणाचा पुढील तपास,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस नाईक गणेश भिंगारदे हे करीत आहेत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर तालुक्याला मराठवाड्याशी जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे श्रीरामपूर - वैजापूर हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सध्या ३० किलोमीटर अंतरासाठी सव्वा ते दीड तासाचा वेळ लागत आहे. 20 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने कोणती ही गाडी येथे चालवता येत नाही. केवळ लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम दोन्ही भागातील जनतेला भोगावे लागत आहेत. त्यामुळे श्रीरामपूर- वैजापूर या रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून सदरचा रस्त्याचे मजबुतीकरण करून हा रस्ता चौपदरी करण्यात यावा यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडून खास निधी या ३० किलोमीटरसाठी उपलब्ध करून घ्यावा आणि वर्षानुवर्ष हाल अपेक्षा भोगणाऱ्या जनतेची सुटका करावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील त्रस्त जनतेने खासदार सदाशिव लोखंडे यांना केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर रस्त्याचे एकूण अंतर ३८ किलोमीटर आहे. यापैकी श्रीरामपूर ते खैरी निमगाव पर्यंतचा आठ किमी पर्येंत चा रस्ता अत्यंत चांगला आहे. तिथून पुढे नाऊर पर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे. या रस्त्यावर इच्छा असूनही वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही. सिंगल रोड असल्याने प्रवासाला वेळ लागतो. तिथून पुढे वैजापूर तालुक्यात लाडगाव पासून पुढे रोड चांगला आहे. मधला रस्ता थोडा खराब आहे. परंतु सिंगल रोड असल्याने इथे सुद्धा तीस किलोमीटर साठी सव्वा ते दीड तास वेळ द्यावा लागतो. त्यातच सध्या उसाच्या गाड्या चालू असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या रस्त्याबाबत दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा रस्ता सोयीस्कर आहे.परंतु खैरी निमगाव ते  नाऊरपर्यंत हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

 वैजापूर तालुक्यातील जनतेचे श्रीरामपूरशी खूप जवळचे संबंध आहेत. लाडगाव, सावखेड गंगा, वांजरगाव या गावातील जनतेचा श्रीरामपूरशी नियमित संपर्क आहे. सरांना बेट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा हा रस्ता सोयीचा आहे. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. नसून ताप असून संताप अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. सध्याच्या रस्त्याचे काम गेल्यावर्षी झाले. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या कामांमध्ये रस्त्याची आणखी दुरावस्था झाली. सध्याच्या रस्त्यावर गाड्या धावतच नाहीत. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो तसेच गाड्या पंचर होण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यासाठी श्रीरामपूर वैजापूर रस्त्याचे चांगल्या प्रकारे मजबुतीकरण होऊन चौपदरीकरण झाल्यास मराठवाड्यात जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता असून पुढे समृद्धी महामार्गाला देखील त्याला जोडता येईल. तेव्हा हे काम फक्त खासदार सदाशिव लोखंडे करू शकतात कारण त्यांचे व नितीन गडकरी यांचे जुने संबंध आहेत. गडकरी साहेबांसाठी या रस्त्यास निधी देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. खासदार सुजयदादा विखे यांनी नगर दक्षिण मध्ये 25 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणले. त्याचप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये गडकरी साहेबांकडून असेच रस्ते विकास निधी आणावा त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी भरीव निधी आणून कायमस्वरूपी या रस्त्याची कटकट काढून टाकावी आणि हा रस्ता मजबूत करावा. गोदावरी नदीवर पुल हा प्रशस्त असल्याने तेथे पुल करायची आवश्यकता नाही. फक्त नदीच्या दोन्ही बाजूकडील रस्ते चांगले मजबूत व्हावेत ही या जनतेची अपेक्षा आहे .

सदरचा रस्ता चांगला झाल्यास त्याच्या फायदा श्रीरामपूरच्या बाजारपेठेला देखील होणार आहे तसेच सराला बेट येथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. जिल्ह्यातील आजी माजी मंत्री सराला बेट ला नियमित येतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. फक्त राजकारण करतात जनतेची सोय मात्र कोणी पाहत नाही. मात्र खासदार लोखंडे या सर्व बाबींना अपवाद आहेत. कमी बोलणारा परंतु काम करणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. तेव्हा आता खासदार लोखंडे यांनी श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून खैरी निमगाव पासून वैजापूर पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व चौपदरी होण्यासाठी विशेष निधी आणून या  भागातील जनतेची वर्षानुवर्षाची समस्या दूर करावी आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील या रस्त्याचा नियमित वापर करणाऱ्या जनतेने व्यक्त केली आहे .

श्रीरामपूर - वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पूल माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नाने झाला. त्यांच्यानंतर मात्र आलेल्या कोणत्याही आमदाराने या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. गोदाकाठचा परिसर खोलवर मातीचा असल्यामुळे रस्त्याचे कामांमध्ये सातत्य राहत नाही. अनेक वर्षानंतर गेल्या वर्षी हा रस्ता डांबरीकरण झाला. मात्र त्याला आता मोठमोठे खड्डे पडले आहे. सध्या तर या रस्त्यावरून जाणे मोठे दुरापास्त झाले आहे. वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी कोणीही चालवू शकत नाही. एवढी बिकट अवस्था रस्त्याची झालेली आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी हे काम फार किरकोळ आहे. तेव्हा त्यांनी आपले वजन खर्च करून नामदार गडकरी यांचेकडून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि या रस्त्याचे काम वर्षभरामध्ये पूर्ण करावे अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.

श्रीरामपूर - वैजापूर दरम्यानचा विद्यमान रस्ता हा दर्जेदार होण्याऐवजी दर्जाहीन झाला आहे. वैजापूर विभाग व श्रीरामपूर विभाग बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. श्रीरामपूर ते नाऊर पर्यंत रस्ता तर खूपच खराब झाला आहे.गेल्या वर्षीच  हा रस्ता झाला. कोटयवधी रुपये त्यावर खर्च दाखवण्यात आला. मात्र त्याचा दर्जा तपासायची वेळ आता आली आहे.या रस्त्याचे दुर्भाग्य म्हणजे अनेक वर्ष न्यायालयीन प्रकारामुळे हा रस्ता दुर्लक्षित होता. कसाबसा तो प्रश्न मिटल्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने जनतेला तोंड झोडून घेण्याची वेळ आता आली आहे. आमदार लहू कानडे, आमदार रमेश बोरणारे यांनी फारसे लक्ष न घातल्याने या ३० किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागू शकतो असा विश्वास दोन्ही तालुक्यातील लोकांना आहे. लोखंडे हे कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे खासदार म्हणून राज्यात परिचित आहेत. तेव्हा त्यांनी आपले वजन वापरून श्रीरामपूर- वैजापूर रस्त्याची दुरावस्था दूर करून या रस्त्याचे मजबुतीकरण, विस्तारीकरण व चौपदरीकरण करण्याच्या कामांमध्ये लक्ष घालावे व श्रीरामपूर वैजापूर मार्फत अहमदनगर जिल्हा व मराठवाडा विभाग जवळ आणण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे अशी विनंती नाऊर, जाफराबाद, खैरी निमगाव, सावखेड गंगा, लाडगाव, वांजरगाव या भागातील जनतेने केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget