सुहास पुजारी यांच्या फिर्यादीवरून, जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ ,७ अन्वये स्वस्त धान्य दुकान चालक शांताबाई कारभारी म्हस्के - पगारे हिच्या विरुद्ध, गुन्हा दाखल करण्यात आला असून. पोलीस कारवाईत, स्वस्त धान्याने भरलेल्या १५ पोती ताब्यात घेण्यात आली असून. या प्रकरणाचा पुढील तपास,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे,पोलीस नाईक गणेश भिंगारदे हे करीत आहेत.
स्वस्त धान्य दुकान चालकाची अरेरावी नागरिकांच्या सतर्कतेमुळे,रेशनचा शेकडो किलो गहू तांदूळ पोलिसांच्या ताब्यात.
श्रीरामपूर : गावं तसं चांगलं पण काही लोकांमुळे भंगल,अशी परिस्थिती,तालुक्यातील एकलहारे ग्रामपंचायतीची झाली आहे. याठिकाणी असलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराने, येथील नागरिकांसाठी आलेले स्वस्त धान्य, काळ्या बाजारात विक्रीस पाठवत असतांना. गावातील काही महिलांनी, टेम्पो आडवून. रेशनचा गहू तांदूळ कुठं चालवले याची विचारपूस केली. मात्र रेशनदुकानदार एस के मस्के यांच्या नावावर असलेल्या,स्वस्त धान्य दुकान चालकाने अरेरावी करत. रेशनचे धान्याने भरलेला टेम्पो काढुन दिला. यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार केल्याने, ग्रामसेवक,तलाठी,सरपंच व ५ पंचांसह, सायंकाळी ५ : ३० वाजेच्या सुमारास, रेशनचे धान्य दुकान सील केले. कारवाईच्या भीतीपोटी रेशन दुकान चालकाने, काळ्या बाजारात पाठवलेले गहू तांदूळ,बारदाने बदललेल्या अवस्थेत, अधिकाऱ्यांनी सील केलेलं कुलूप उघडून, काळ्या बाजारात नेलेले गहू तांदूळ परत आणले. मात्र ग्रामस्थानी त्यास विरोध करून. पुरवठा अधिकारी व तलाठी यांना बोलावून, रेशन दुकानाचा पंचनामा करून. संबंधित रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल केला असून. गरिबांच्या तोंडचे अन्न चोरून नेणाऱ्या, स्वस्त धान्य दुकान चालक राहुल पगारे याच्या विरुद्ध,कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. स्वस्त धान्य घोटाळ्या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात, पुरवठा निरीक्षक
Post a Comment