वरील अर्जात नमूद कालावधीमधील झालेल्या व चालू असलेल्या व दहा बारा दिवसांमध्ये गेल्या नामदार विखेंच्या हातसे उद्घाटन झालेल्या व केलेल्या कामांची सखोल चौकशी होऊन संबंधित व कामावर वापरलेल्या मटेरियल ची उच्चस्तरीय सूक्ष्म चौकशी करून कार्यवाही साठी व संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी व काम करणारे निकृष्ट थातूरमातूर काम करणारे ठेकेदार यांना काळया यादीत टाकावे व त्यांनी केलेले काम व कामापोटी काढलेल्या व काढण्याच्या तयारीत असलेली सर्व बिले तात्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयासमोर भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण, जिल्हाध्यक्ष -रज्जाक भाई शेख ,जिल्हा संघटक- राजेंद्र त्रिभुवन आदी लहुजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणास बसले आहे.
निकृष्ट थातुर-मातुर कामांची सखोल चौकशी करावी,लहुजी सेनेचा श्रीरामपूर नगरपरिषद समोर आमरण उपोषण..!!
श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर नगरपरिषद यांच्या अधिपत्याखाली बांधकाम अभियंता व मर्जीतील ठेकेदार यांना कामे वाटप केले व अर्थिक संगणमत करून सन २०२१-२०२२ मध्ये पूर्ण केलेल्या व चालू असलेल्या ,व गेली आठ दिवसात पूर्ण झालेल्या विविध रस्त्यांच्या विकास कामामध्ये केलेली कार्यालय अनियमितता गैरप्रकार व झालेले चालू असलेले रस्ते निकृष्ट थातूरमातूर कामे करून टक्केवारी घेऊन बिले काढले व झालेल्या सर्व कामे थातूर-मातूर निकृष्ट खडी व अल्प प्रमाणात डांबर वापरून शहरातील अनेक रस्त्यांची कामे केली सदरील उपोषण अर्जात नमूद कामाची सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने नगरपरिषद श्रीरामपूर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास दि.२७/१२/०२२ रोजी सुरुवात झाली आहे.
Post a Comment