श्रीरामपूर - वैजापूर रस्त्याचे एकूण अंतर ३८ किलोमीटर आहे. यापैकी श्रीरामपूर ते खैरी निमगाव पर्यंतचा आठ किमी पर्येंत चा रस्ता अत्यंत चांगला आहे. तिथून पुढे नाऊर पर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे. या रस्त्यावर इच्छा असूनही वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही. सिंगल रोड असल्याने प्रवासाला वेळ लागतो. तिथून पुढे वैजापूर तालुक्यात लाडगाव पासून पुढे रोड चांगला आहे. मधला रस्ता थोडा खराब आहे. परंतु सिंगल रोड असल्याने इथे सुद्धा तीस किलोमीटर साठी सव्वा ते दीड तास वेळ द्यावा लागतो. त्यातच सध्या उसाच्या गाड्या चालू असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या रस्त्याबाबत दोन्ही तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार आत्तापर्यंत दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला खिळ बसली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा रस्ता सोयीस्कर आहे.परंतु खैरी निमगाव ते नाऊरपर्यंत हा रस्ता अत्यंत वाईट अवस्थेत आहे.
वैजापूर तालुक्यातील जनतेचे श्रीरामपूरशी खूप जवळचे संबंध आहेत. लाडगाव, सावखेड गंगा, वांजरगाव या गावातील जनतेचा श्रीरामपूरशी नियमित संपर्क आहे. सरांना बेट येथे जाणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा हा रस्ता सोयीचा आहे. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. नसून ताप असून संताप अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. सध्याच्या रस्त्याचे काम गेल्यावर्षी झाले. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या कामांमध्ये रस्त्याची आणखी दुरावस्था झाली. सध्याच्या रस्त्यावर गाड्या धावतच नाहीत. त्यामुळे लोकांचा वेळ वाया जातो तसेच गाड्या पंचर होण्याचा किंवा अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यासाठी श्रीरामपूर वैजापूर रस्त्याचे चांगल्या प्रकारे मजबुतीकरण होऊन चौपदरीकरण झाल्यास मराठवाड्यात जाण्यासाठी हा अत्यंत सोयीचा रस्ता असून पुढे समृद्धी महामार्गाला देखील त्याला जोडता येईल. तेव्हा हे काम फक्त खासदार सदाशिव लोखंडे करू शकतात कारण त्यांचे व नितीन गडकरी यांचे जुने संबंध आहेत. गडकरी साहेबांसाठी या रस्त्यास निधी देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. खासदार सुजयदादा विखे यांनी नगर दक्षिण मध्ये 25 कोटी रुपये वेगवेगळ्या रस्त्यांसाठी मंजूर करून आणले. त्याचप्रमाणे खासदार लोखंडे साहेबांनी सुद्धा आपल्या मतदारसंघांमध्ये गडकरी साहेबांकडून असेच रस्ते विकास निधी आणावा त्यात प्रामुख्याने श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी भरीव निधी आणून कायमस्वरूपी या रस्त्याची कटकट काढून टाकावी आणि हा रस्ता मजबूत करावा. गोदावरी नदीवर पुल हा प्रशस्त असल्याने तेथे पुल करायची आवश्यकता नाही. फक्त नदीच्या दोन्ही बाजूकडील रस्ते चांगले मजबूत व्हावेत ही या जनतेची अपेक्षा आहे .
सदरचा रस्ता चांगला झाल्यास त्याच्या फायदा श्रीरामपूरच्या बाजारपेठेला देखील होणार आहे तसेच सराला बेट येथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. जिल्ह्यातील आजी माजी मंत्री सराला बेट ला नियमित येतात. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही. फक्त राजकारण करतात जनतेची सोय मात्र कोणी पाहत नाही. मात्र खासदार लोखंडे या सर्व बाबींना अपवाद आहेत. कमी बोलणारा परंतु काम करणारा खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. तेव्हा आता खासदार लोखंडे यांनी श्रीरामपूर - वैजापूर रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून खैरी निमगाव पासून वैजापूर पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व चौपदरी होण्यासाठी विशेष निधी आणून या भागातील जनतेची वर्षानुवर्षाची समस्या दूर करावी आणि जनतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील या रस्त्याचा नियमित वापर करणाऱ्या जनतेने व्यक्त केली आहे .
श्रीरामपूर - वैजापूर तालुक्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पूल माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नाने झाला. त्यांच्यानंतर मात्र आलेल्या कोणत्याही आमदाराने या रस्त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. गोदाकाठचा परिसर खोलवर मातीचा असल्यामुळे रस्त्याचे कामांमध्ये सातत्य राहत नाही. अनेक वर्षानंतर गेल्या वर्षी हा रस्ता डांबरीकरण झाला. मात्र त्याला आता मोठमोठे खड्डे पडले आहे. सध्या तर या रस्त्यावरून जाणे मोठे दुरापास्त झाले आहे. वीस पेक्षा जास्त वेगाने गाडी कोणीही चालवू शकत नाही. एवढी बिकट अवस्था रस्त्याची झालेली आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी हे काम फार किरकोळ आहे. तेव्हा त्यांनी आपले वजन खर्च करून नामदार गडकरी यांचेकडून या रस्त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा आणि या रस्त्याचे काम वर्षभरामध्ये पूर्ण करावे अशी अपेक्षा दोन्ही तालुक्यातील जनतेने व्यक्त केली आहे.
श्रीरामपूर - वैजापूर दरम्यानचा विद्यमान रस्ता हा दर्जेदार होण्याऐवजी दर्जाहीन झाला आहे. वैजापूर विभाग व श्रीरामपूर विभाग बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. श्रीरामपूर ते नाऊर पर्यंत रस्ता तर खूपच खराब झाला आहे.गेल्या वर्षीच हा रस्ता झाला. कोटयवधी रुपये त्यावर खर्च दाखवण्यात आला. मात्र त्याचा दर्जा तपासायची वेळ आता आली आहे.या रस्त्याचे दुर्भाग्य म्हणजे अनेक वर्ष न्यायालयीन प्रकारामुळे हा रस्ता दुर्लक्षित होता. कसाबसा तो प्रश्न मिटल्यानंतर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने जनतेला तोंड झोडून घेण्याची वेळ आता आली आहे. आमदार लहू कानडे, आमदार रमेश बोरणारे यांनी फारसे लक्ष न घातल्याने या ३० किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मात्र आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी मनावर घेतल्यास हा प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागू शकतो असा विश्वास दोन्ही तालुक्यातील लोकांना आहे. लोखंडे हे कमी बोलणारे आणि जास्त काम करणारे खासदार म्हणून राज्यात परिचित आहेत. तेव्हा त्यांनी आपले वजन वापरून श्रीरामपूर- वैजापूर रस्त्याची दुरावस्था दूर करून या रस्त्याचे मजबुतीकरण, विस्तारीकरण व चौपदरीकरण करण्याच्या कामांमध्ये लक्ष घालावे व श्रीरामपूर वैजापूर मार्फत अहमदनगर जिल्हा व मराठवाडा विभाग जवळ आणण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे अशी विनंती नाऊर, जाफराबाद, खैरी निमगाव, सावखेड गंगा, लाडगाव, वांजरगाव या भागातील जनतेने केली आहे.
Post a Comment