औरंगाबाद येथे राज्य अजिंक्य पद मास्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते या स्पर्धेत पोलीस दलातील अनेक संघ व पोलीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता अहमदनगर पोलीस दलातील महिला पोलीस हवालदार अर्चना काळे आणि पोलीस हवलदार अनवर अली सय्यद यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या पूर्वतयारीत अनवर अली सय्यद आणि अर्चना काळे यांनी अहमदनगर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात मोठे परिश्रम करून सराव केला होता. या स्पर्धेत जाताना त्यांचे क्रीडाशिक्षक यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शुभेच्छा देऊन या दोन्ही खेळाडूंना दिले होते.
पोलीस हवालदार अन्वरअली सय्यदअली सय्यद यांनी 900 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच लांब उडी स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळवले. आणि शंभर मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. तसेच महिला पोलीस हवालदार अर्चना काळे यांनी 100 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांकावर येऊन सुवर्णपदक मिळविले. त्याचबरोबर 200 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. आणि 400 मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक वर येऊन सुवर्णपदकावर हक्क प्रस्थापित केला. या दोन्ही क्रीडा पोलिसांनी औरंगाबाद येथील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा वर्षाव करून अहमदनगर पोलिस दलाची मान उंचावली. या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकूण सहा सुवर्णपदक मिळवल्याने पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पोलीस अधीक्षक राकेश यांनी खेळाडूंचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला व आगामी स्पर्धेतही अशीच सुवर्ण कामगिरी करून पोलीस दलाचे नाव उंच करून पोलीस दलाची शान राखावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
Post a Comment