माता, गोमाता, माती यांची काळजी घेण्याची गरज -सेंद्रीय शेतीचे जनक राम मुखेकर
बेलापुर (प्रतिनिधी )-रासायनिक खताच्या अती वापरामुळे आपले पोषण करणाऱ्या मातीतील जिवाणू लोप पावत चालले असुन माती जिवंत, सजिव ठेवावयाची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असुन माता गोमाता व माती यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांनी व्यक्त केले श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील पुरुषोत्तम आण्णासाहेब थोरात यांच्या गाय गोठ्यास त्यांनी भेट दिली त्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राम मुखेकर पुढे म्हणाले की माता-पिता ,गोमाता , व माती या सर्वांचे रक्षण करण्याची, काळजी घेण्याची वेळ आलेली आहे माता-पित्यांची काळजी न घेतल्यामुळे समाजात वृद्धाश्रमांची सख्या वाढत आहे हे आपले दुर्दैव आहे गोमातेची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे शेतकरी बंधुंचा दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे लंपीसारख्या आजाराने पशुधन धोक्यात आलेले आहे रासायनिक खते वापरुन पिकवीलेले अन्न आपण खात असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे आपल्याला सकस आहार न मिळणे हेच आजाराचे मुख्य कारण आहे तेच पिकांच्याही बाबतीत होत आहे पिकात असलेल्या कमजोरीमुळे पिकावर रोग येतो त्यामुळे कमजोरीवर उपाय करण्या ऐवजी आपण रोगावरच मोठ्या प्रमाणात खर्च करतो परिणामी खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी अवस्था होते त्यामुळे पिकाला, झाडाला सशक्त मजबुत बनवायचे असेल तर भरपुर पोषण द्या पिकाला भरपुर पोषण दिले तर रोगच येणार नाही रासायनिक खताचा वापर टाळा सेंद्रिय शेती करा उत्पन्नही जोमदार निघेल पिकविणारा अन खाणारा दोघेही समाधानी राहील असेही ते म्हणाले या वेळी ब्राम्हणगाव भांड येथील शेतकरी सुरेश वारुळे यांनी सेंद्रिय शेतीचे काय फायदे होतात याचे अनुभव सांगितले या वेळी शेखर वाकचौरे वरुण तुवर विशाल कोकणे आण्णासाहेब जाधव देवराम वाबळे सौरभ उगले अमित घोडके उमेश मुखेकर प्रविण आहेर सदाशिव कोळसे अक्षय खरात इश्वर दरंदले प्रतापराव पटारे ज्ञानदेव थोरात नवनाथ गडाख विठ्ठल बोठे शंकर थोरात आदिसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर शेतकरी संघटनेचे प्रकाश आण्णासाहेब थोरात यांनी आभार मानले
Post a Comment