Latest Post

श्रीरामपूर : जीवनाला लयबध्द आकार देउन सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधण्याचे काम नृत्यकला करत असते.मोरया डान्स अकॅडमी श्रीरामपूर शहरात विद्यार्थ्यांच्या कलागूणांबरोबरच सामाजिक,धार्मिक गूणांची जोपासना करण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडत आहे.असे प्रतिपादन बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांनी केले.

         मोरया डान्स अकॅडमी आयोजीत विविध स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी अर्जृन दाभाडे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,डाॅ.सागर जयस्वाल,मोरया डान्स अकॅडमीचे संचालक कासिम सय्यद यांची प्रमूख उपस्थिती होती.

        गणेशोत्सावानिमित्त  डान्स स्पर्धा,फॅशन शो स्पर्धा,संगीत खूर्ची,लिंबू चमचा,थ्रो बाॅल,फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

        सहर्षा साळवे हिने  फॅशन शो प्रथम क्रमांक,लिंबू चमचा द्वितीय क्रमांक,नृत्य स्पर्धा तृतीय क्रमांक,नक्षत्र डान्स अकॅडमी आयोजीत तालूकास्तरीय नृत्य स्पर्धेत "सूपर डान्सर अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले.पालकांसाठी आयोजीत संगीत खूर्ची स्पर्धेत वर्षा गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला.अर्श शेख,श्रध्दा खंडीझोड,आर्वी वाघूंडे,पलक पांडे,जिविका पांडे यांनी देखील प्राविण्य मिळविले.याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेमार्फत सर्वांना 200 पेजेस वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

       स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक कासिम सय्यद सर,कू.दिव्या गायकवाड,ओम पाटील,कु.गौरी खटोड,कु.अक्षता वाकळे,कु.श्रध्दा खंडीझोड यांनी विशेष परिश्रम घेतले.


शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे श्री साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसापूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केल्या संदर्भात जबाबदार धरून या आरोपा संदर्भात शिर्डी पोलिसांनी त्यांनाअटक केली आहे, श्री साईबाबा संस्थान चे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याचे वृत्त शिर्डीत पसरताच मोठी खळबळ निर्माण झाली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसेच श्री साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे ,तसा साई संस्थान ने 2018 मध्ये ही नियमच केला होता ,शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या ,मात्र या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत श्री साई मंदिरामध्ये 31 ऑगस्ट 20 21 रोजी श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल माध्यमात प्रसिद्ध झाले होते ,हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती 

यासंदर्भात मोठी चर्चाही शिर्डीत झाली होती या सर्व चर्चेने व सुरक्षा या दृष्टीने यास जबाबदार असणारे श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप,विनोद कोते,राहुल फुंदे,सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून 501,408, 465,469,34,66(B),2(1),66,43,443(B),43(G),84,5 अश्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

अटकेचे वृत्त शिर्डीत येताच साईभक्त ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे साईबाबा संस्थानची तसेच साई मंदिराची सुरक्षा महत्त्वाचे असताना व तसा नियम कायदा असताना त्याप्रमाणे कोरोना काळात इतर साईभक्तांना प्रवेश नसताना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मंदिरात गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता चौकशीअंती सविस्तर माहिती पुढे येईल मात्र या अटकेने शिर्डीत नव्हे तर संपूर्ण देश-विदेशआत साई भक्तांमध्ये चर्चेला उधाण आले आहे संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत या संदर्भात अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने व शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.


बेलापुर (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावा जवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असुन या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत समजलेली माहीती अशी की चैतन्य अनिल माळी वय १२ वर्ष दत्ता अनिल माळी वय ८ वर्ष चैतन्य शाम बर्डे वय ४ वर्ष ही तीन लहान मुळे खेळता खेळता कान्हेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेततळ्याजवळ गेली पावसाचे पाणी या तळ्यात साचलेले होते त्यामुळे पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही व हे तिनही मुले पाण्यात बुडून मयत झाले ही घटना परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले तिनही मुलांचे शव बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्यात आले आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-प्रवरा नदी पात्रातुन बेकायदा वाळू उपसा करणारे ९ चप्पू श्रीरामपुर तहसीलदार व त्याच्या पथकाने तोडून नष्ट केले असुन प्रवरा पात्रातुन पाण्यातून वाळू काढुन त्याची विक्री करणाऱ्या वाळू तस्करांना मोठा दणका दिला आहे प्रवरा नदीला पाणी आल्यामुळे वाळू तस्करांनी पाण्यातून वाळू काढण्यासाठी थर्माकाँलचे चप्पू तयार केले एका चप्पूच्या सहाय्याने तीन ते चार बैलगाड्या वाळू उपसा केला जातो असे अनेक चप्पू प्रवरा पात्रात असल्याची खबर श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांना मिळाली शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे वाळू तस्करही निवांतपणे वाळू उपसा करण्यात मग्न झाले होते राहुरीच्या कामगार तलाठी गायसमुद्रे  तसेच श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील मंडलाधिकारी मंडलीक मांडवे येथील कामगार तलाठी निर्मला नाईक कामगार तलाठी थोरात यांच्या संयुक्त पथकाने प्रवरा नदी पात्रातुन बेकायदा वाळू उपसा करणारे नऊ चप्पू पकडले व लगेच जे सी बी मशिनच्या मदतीने ते तोडून टाकण्यात आले एका चप्पूची अंदाजे किंमत २५ हजार रुपये असावी असे नऊ चप्पू म्हाणजे सव्वा दोन लाखाचे वाळू उपसा करणारे  सामान या कारवाईत नष्ट करण्यात आले श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील व त्याच्या पथकाने नियोजनबध्द छापा टाकुन वाळू तस्करी करणारे साहीत्य नष्ट केलेआहे तसेच कडीत बु येथे सात ब्रास साठवलेली वाळूही जप्त करण्यात आली आहे वाळू तस्कर मात्र पसार झाले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपापसात होणारे मतभेद हे वादाचे मुख्य कारण असुन या कारणामुळेच न्यायालयात खटले जास्त तर न्यायाधिशांची संख्या कमी त्यामुळे न्यायालयावर कामाचा ताण येत असल्याचे मत तदर्थ जिल्हा न्यायाधिश १ व सहाय्यक सत्र न्यायाधिश बी बी तोष्णीवाल यांनी व्यक्त केले.  मा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील कार्यक्रमानुसार तालुका विधी सेवा समीती श्रीरामपुर वकील संघ व बेलापुर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी शिबीराच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्यायाधीश

बी बी तोष्णीवाल म्हणाले की मतभेदातून होणारे वाद हे जागेवरच मिटले पाहीजे त्या करीता मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे दिवाणी फौजदारी महीला विषयक कौटुंबिक वाद मध्यस्थामार्फत सोडविले जातील त्यामुळे वेळेची बचत होईल कायद्याने आता मुलाप्रमाणेच मुलींनाही समान अधिकार दिलेले आहेत अनेकांना आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाता येत नाही त्यांना कायदेविषयक ज्ञान देण्याकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन असे उपक्रम वर्षभर सुरु राहणार असल्याचे न्यायाधीश तोष्णीवाल यांनी सांगितले २ रे सह दिवाणी न्यायाधीश सौ एस व्ही मोरे शिबीरार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की  समाजात महीलावरील अत्याचारात दररोज वाढ होताना दिसत आहे केवळ अशिक्षित लोक हे गुन्हे करतात असे नाही सुशिक्षित कायद्याचे ज्ञान असणारे लोकही गुन्हे करत आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बालविवाहचा कायदा झालेला असतानाही बालविवाह होतात ही शोकांतीका आहे महीलांना पोटगीचा अधिकार दिलेला आहे अनेक कायदे हे नागरीकांच्या भल्यासाठी केले जातात परंतु काही ठिकाणी त्याचा गैरवापर केला जातो या सर्वावर नियंत्रण आणावयाचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मुलावर कुटुंबावर चांगले संस्कार करण्याची गरज असल्याचे मत न्यायाधीश सौ एस व्ही मोरे यांनी व्यक्त केले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.पी पी गटणे पोलीस निरीक्षक संजय सानप अँड एस आर बिहाणी अँड .जगन्नाथ राठी ,अँड.सुहास चुडीवाल ,अँड. मनिषा वर्मा ,अँड. पंकज म्हस्के,अँड.ईजाज शेख अँड अविनाश भोकरे ,अँड वैभव खंडागळे ,अँड.अमोल भोकरे ,अँड सुनिल कपुर ,अँड .सुनिल शेळके मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान विधी व न्याय समितीचे दिलीप थोरात संदीप शेरमाळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे निखील तमनर हरीष पानसंबळ गणेश भिंगारदे कामगार तलाठी हडोळे मिलींद दुधाळ अरुण आमोलीक दादा कुताळ मोहसीन सय्यद नितीन नवले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा विष्णूपंत डावरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर अँड जिवन पांडे यांनी सूत्रसंचलन केले शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )-बेलापूर येथील गुप्तधना मुळे जीव गमविणाऱ्या सुनील गायकवाड यांच्या गरीब कुटुंबांला मदत करण्याच्या उद्देशाने मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे आर पीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष संदीप मगर  यांच्या वतीने तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान घरपोहोच करण्यात आले. या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की बेलापूरातील सुनिल गायकवाड याच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यांना चार लहान लहान मुली आहेत कुटुंबाचा सुनिल एकमेव आधार होता त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे काही मंडळी आम्हाला बाहेरची म्हणतात पण त्यांच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली असुन त्या कुटुंबाला मदत करणे सोडाच मानसिक आधार देण्यासही कुणी पुढे आले नाही गाव पुढारी म्हणवणारेच त्या कुटुंबाला दोष देत आहेत तुम्हाला मदत करता येत नसेल तर करु नका तुमच्यातील माणूसकी संपली असली तरी आमच्यात अजुन जिवंत आहे  यात कुणाचा पोटशूळ उठण्याचे कारण नाही या मजुराच्या तोंडचा घास पळविणारेच साप साप म्हणून डांगोरा पिटत आहे असेही ते म्हणाले  त्याप्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नानासाहेब मांजरे मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे मनविसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे आदी उपस्थित होते,किराणा सामान देवुन या गरीब कुटुंबाला छोटासा आधार देण्याचा प्रयत्न मनसे, आर पी आय, भिम शक्ती, यांच्या वतीने करण्यात

आला, गायकवाड कुटुंब अतिशय गरीब व प्रामाणिक आहे  त्यांना छोटी छोटी मुले असल्याकारणाने सर्व दानशूरांनी व राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करावी असे अवाहनही  मनसे भिमशक्ती आरपीआय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- गुप्तधन खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड यांच्या आत्महत्या प्रकरणी खटोड बंधुंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे      येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने रवीवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना गळफास घेवुन आत्महत्या केली होती त्या नंतर मयताची पत्नी वंदना गायकवाड हीने पोलीसात तक्रार दाखल केली होती की खोदकाम करताना गुप्त धन सापडले होते त्या वेळी या गुप्त धनाचा बोभाटा न करण्यासाठी खटोड बंधुनी सुनिल यास अकरा लाख रुपये कबुल केले होते पैकी १ लाख २८ हजार रुपये दिले होते बाकीचे पैसै मागीतले असता शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने श्रीरामपुर शहर पोलीसाकडे दिलेल्या तक्रारीत केला होता  या बाबत राजेश खटोड व हनुमंत खटोड यांनी अटकपूर्व जामीन मिळावा या करीता न्यायालयात अर्ज दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधिश नांदगावकर यांनी खटोड बंधुचा तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे   या बाबत  मयत सुनिल गायकवाड यांने अँफिवड्यूट करुन दिले होते तसेच हयात असताना वेळोवेळी पैसे मागणी बाबत कुठलेही लेखी अथवा तोंडी पुरावे नाही. पैसे मागणी बाबत कुठलाही पुरावा  नाही सापडलेले गुप्तधन शासनाकडे जमा केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मयत सुनिल गायकवाड याने लेखी दिले होते त्या नंतर खटोड बंधु विरुध्द त्याने पोलीसाकडे तक्रार देखील दाखल केलेली नाही त्यामुळे मयताच्या पत्नीने केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हणणे अँड एन जी खंडागळे व अँड वैभव खंडागळे यांनी मांडले त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती नांदगावकर यांनी खटोड बंधुंना तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे खटोड हे राजकीय  सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्यामुळे तालुक्याचे लक्ष न्यायालयाकडे लागले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget