शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश हे श्री साई मंदिरात उपस्थित असल्याचे फोटो काही दिवसापूर्वी सोशल माध्यमात व्हायरल केल्या संदर्भात जबाबदार धरून या आरोपा संदर्भात शिर्डी पोलिसांनी त्यांनाअटक केली आहे, श्री साईबाबा संस्थान चे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याचे वृत्त शिर्डीत पसरताच मोठी खळबळ निर्माण झाली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर व परिसरात सध्या कोरोनामुळे साईभक्तांना बंदी आहे, तसेच श्री साई मंदिराची सुरक्षा ध्यानात घेऊन शिर्डीतील साई मंदिरातील कोणाचेही फोटो किंवा व्हिडिओ बाहेर सोशल माध्यमावर व्हायरल करणे हे गुन्हा आहे ,तसा साई संस्थान ने 2018 मध्ये ही नियमच केला होता ,शासनानेही यासंदर्भात संस्थांनला सूचना केल्या होत्या ,मात्र या नियमाचा भंग करत संस्थान प्रशासनाने व त्यांच्या अधिकाऱ्यांनी शिर्डीत श्री साई मंदिरामध्ये 31 ऑगस्ट 20 21 रोजी श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व समितीचे सदस्य धर्मदाय आयुक्त अहमदनगर हे उपस्थित असल्याचे फोटो सोशल माध्यमात प्रसिद्ध झाले होते ,हे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश तसा धर्मादाय आयुक्त यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता तशी तक्रारही सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली होती
यासंदर्भात मोठी चर्चाही शिर्डीत झाली होती या सर्व चर्चेने व सुरक्षा या दृष्टीने यास जबाबदार असणारे श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह अजित जगताप,विनोद कोते,राहुल फुंदे,सचिन गव्हाणे आणि चेतक साबळे या सर्वांवर मंदिर सुरक्षा पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून 501,408, 465,469,34,66(B),2(1),66,43,443(B),43(G),84,5 अश्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
अटकेचे वृत्त शिर्डीत येताच साईभक्त ग्रामस्थ यांच्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे साईबाबा संस्थानची तसेच साई मंदिराची सुरक्षा महत्त्वाचे असताना व तसा नियम कायदा असताना त्याप्रमाणे कोरोना काळात इतर साईभक्तांना प्रवेश नसताना संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मंदिरात गेल्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता चौकशीअंती सविस्तर माहिती पुढे येईल मात्र या अटकेने शिर्डीत नव्हे तर संपूर्ण देश-विदेशआत साई भक्तांमध्ये चर्चेला उधाण आले आहे संस्थांच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला अटक होण्याचा शिर्डी संस्थान इतिहासात पहिलाच प्रकार शिर्डीत घडत आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत या संदर्भात अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने व शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करत आहेत.
Post a Comment