मोरया डान्स अकॅडमी आयोजीत विविध स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमासाठी अर्जृन दाभाडे,अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे,डाॅ.सागर जयस्वाल,मोरया डान्स अकॅडमीचे संचालक कासिम सय्यद यांची प्रमूख उपस्थिती होती.
गणेशोत्सावानिमित्त डान्स स्पर्धा,फॅशन शो स्पर्धा,संगीत खूर्ची,लिंबू चमचा,थ्रो बाॅल,फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
सहर्षा साळवे हिने फॅशन शो प्रथम क्रमांक,लिंबू चमचा द्वितीय क्रमांक,नृत्य स्पर्धा तृतीय क्रमांक,नक्षत्र डान्स अकॅडमी आयोजीत तालूकास्तरीय नृत्य स्पर्धेत "सूपर डान्सर अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले.पालकांसाठी आयोजीत संगीत खूर्ची स्पर्धेत वर्षा गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला.अर्श शेख,श्रध्दा खंडीझोड,आर्वी वाघूंडे,पलक पांडे,जिविका पांडे यांनी देखील प्राविण्य मिळविले.याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेमार्फत सर्वांना 200 पेजेस वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक कासिम सय्यद सर,कू.दिव्या गायकवाड,ओम पाटील,कु.गौरी खटोड,कु.अक्षता वाकळे,कु.श्रध्दा खंडीझोड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment