बेलापुर (प्रतिनिधी )- गुप्तधन खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड यांच्या आत्महत्या प्रकरणी खटोड बंधुंना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे येथील खोदकाम करणारा मजुर सुनिल गायकवाड याने रवीवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना गळफास घेवुन आत्महत्या केली होती त्या नंतर मयताची पत्नी वंदना गायकवाड हीने पोलीसात तक्रार दाखल केली होती की खोदकाम करताना गुप्त धन सापडले होते त्या वेळी या गुप्त धनाचा बोभाटा न करण्यासाठी खटोड बंधुनी सुनिल यास अकरा लाख रुपये कबुल केले होते पैकी १ लाख २८ हजार रुपये दिले होते बाकीचे पैसै मागीतले असता शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने श्रीरामपुर शहर पोलीसाकडे दिलेल्या तक्रारीत केला होता या बाबत राजेश खटोड व हनुमंत खटोड यांनी अटकपूर्व जामीन मिळावा या करीता न्यायालयात अर्ज दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायाधिश नांदगावकर यांनी खटोड बंधुचा तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे या बाबत मयत सुनिल गायकवाड यांने अँफिवड्यूट करुन दिले होते तसेच हयात असताना वेळोवेळी पैसे मागणी बाबत कुठलेही लेखी अथवा तोंडी पुरावे नाही. पैसे मागणी बाबत कुठलाही पुरावा नाही सापडलेले गुप्तधन शासनाकडे जमा केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी मयत सुनिल गायकवाड याने लेखी दिले होते त्या नंतर खटोड बंधु विरुध्द त्याने पोलीसाकडे तक्रार देखील दाखल केलेली नाही त्यामुळे मयताच्या पत्नीने केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हणणे अँड एन जी खंडागळे व अँड वैभव खंडागळे यांनी मांडले त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती नांदगावकर यांनी खटोड बंधुंना तात्पुरता अंतरिम अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे खटोड हे राजकीय सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असल्यामुळे तालुक्याचे लक्ष न्यायालयाकडे लागले होते.
Post a Comment