श्रीरामपुर (प्रतिनिधी )-बेलापूर येथील गुप्तधना मुळे जीव गमविणाऱ्या सुनील गायकवाड यांच्या गरीब कुटुंबांला मदत करण्याच्या उद्देशाने मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे आर पीआय चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन भीमशक्ती चे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या वतीने तीन महिने पुरेल एवढे किराणा सामान घरपोहोच करण्यात आले. या वेळी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की बेलापूरातील सुनिल गायकवाड याच्या आत्महत्येमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यांना चार लहान लहान मुली आहेत कुटुंबाचा सुनिल एकमेव आधार होता त्यामुळे माणूसकीच्या भावनेतून आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे काही मंडळी आम्हाला बाहेरची म्हणतात पण त्यांच्या गावात एक दुर्दैवी घटना घडली असुन त्या कुटुंबाला मदत करणे सोडाच मानसिक आधार देण्यासही कुणी पुढे आले नाही गाव पुढारी म्हणवणारेच त्या कुटुंबाला दोष देत आहेत तुम्हाला मदत करता येत नसेल तर करु नका तुमच्यातील माणूसकी संपली असली तरी आमच्यात अजुन जिवंत आहे यात कुणाचा पोटशूळ उठण्याचे कारण नाही या मजुराच्या तोंडचा घास पळविणारेच साप साप म्हणून डांगोरा पिटत आहे असेही ते म्हणाले त्याप्रसंगी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष नानासाहेब मांजरे मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे मनविसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे आदी उपस्थित होते,किराणा सामान देवुन या गरीब कुटुंबाला छोटासा आधार देण्याचा प्रयत्न मनसे, आर पी आय, भिम शक्ती, यांच्या वतीने करण्यात
आला, गायकवाड कुटुंब अतिशय गरीब व प्रामाणिक आहे त्यांना छोटी छोटी मुले असल्याकारणाने सर्व दानशूरांनी व राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक संघटनांनी या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करावी असे अवाहनही मनसे भिमशक्ती आरपीआय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment