Latest Post

श्रीरामपूर -श्रीरामपूर मधील दत्तनगर गावातील एमआयडीसी साई काँनर् पासून गणेश नगर राहता शिर्डी बायपास पर्यन्त रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असुन हे खड्डे बुजवण्यासाठी दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी गेली अनेक वर्षेपासून वेगवेगळ्या प्रकारची अदोलने केली आहे कधी खड्डे मध्ये झोपून तर कधी खड्डे मध्ये झाडे लावून पण हा रस्ता वादग्रस्त असुन जिल्हा परिषद एमआयडीसी प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांनकडे बोट दाखवत आहे अनेक जन खड्डे चुकवण्यासाठी धडकले आहे काही जण जायबंदी तर कुटुंबातील सदस्य हातपाय गमावून बसावे लागले आहेत पण काल एमआयडीसी रोडवर संध्याकाळी असेच खड्डे चुकवण्यासाठी एका मोटारसायकल ने सायकल स्वराला उडवून दिले यात एक गंभीर जखमी तर दुसरा डोक्यावर पडलेल्या असल्याने नाजूक परिस्थिती मध्ये आहे तरी देखील या रस्त्याची जबाबदारी कोणीही घेत नसल्याने अपघात घडलेल्या ठिकाणी खड्ड्यात बसुन मुडंन अदोलन केले व घडलेल्या भिषण अपघातचा निषेध नोंदवला आहे या अदोलना प्रसंगी उत्तर महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी निषेधार्थ भाषणात15दिवसात अदोलनाची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे न बजवलेस संबंधित अधिकारी यांच्या तोडाला काळे फासण्यात येईल तर भिमशकती जिल्हा अध्यक्ष संदीप मगर यांनी रस्ता खराब, स्ट्रीट लाईट पुर्णपणे बंद आहे अधिकारी लक्ष देत नसल्याने याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजेन  आम आदमी चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुगरवाल यांनी एमआयडीसी मधील रस्ते खड्डेमय झाले आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेसुद्धा समजत नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे मौत का कुवा झाला आहे यावेळी प्रशासनाचा निषेध करून मुंडण आंदोलन करण्यात आले या प्रसंगी दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच सुनील शिरसाठ आरपीआय ता.संघटक संजय बोरगे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे ,प्रदिप गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिवलकर, संजय थोरात, संदीप गायकवाड, वालमीक निकम, संतोष निकम, अशोक शिंदे, अदी उपस्थित होते.

नेवासा (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीच्या आत्येभावाने दिली असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली.वैष्णवी आरगडे या अल्पवयीन मुलीचा रविवारी सकाळी झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या घरच्यांनी सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची बनाव निर्माण केला होता. तथापि मृतदेहाचे नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता श्वास नलीकेवर कशाने तरी दबाव टाकून व त्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू आला असले बाबत अभिप्राय डॉक्टरांनी दिला होता. या अभिप्राय नुसार यातील मयत वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय 9 वर्षे) रा .सौंदाळा ता.नेवासा हीस दि. 20 जून चे रात्री 10 वा. ते 21 जून रोजी पहाटे 6 वाजेचे दरम्यान राहते घरात सौंदाळा ता.नेवासा येथे झोपेत असताना तीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासांठी तीचे श्वासनलिकेवर दबाव टाकुन तीस जीवे ठार मारुन तीचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत हवालदार भिमराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार दि.22 जून रोजी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द भारतीय दंड विधान कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सोमवारी दिवसभर आरोपींना शोधण्यासाठी पराकाष्ठा केली.शेवटी त्यांनी सौंदाळा येथे मामाकडेच राहत असलेला आणि या घटनेत सुरुवातीपासूनच संशयित असलेला मयत मुलीच्या आत्याचा मुलगा आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय 22 वर्षे) मूळ रा.आपेगाव,ता.पैठण याला एलसीबीच्या विशेष पथकाने चांगलाच पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली.दरम्यान शवविच्छेदानंतर रविवारी रात्री उशिरा वैष्णवीच्या पार्थिवावर सौंदाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. सोमवार दि.22 जून रोजी अपर पोलीस अधिक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक मंदार जवळे हे तळ ठोकून होते. त्यांनी पुन्हा सौंदाळा गावी भेट देऊन चौकशी करुन ठोस धागा मिळवण्याचा प्रयत्न केला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर नगरपरिषदेचे प्रशासन भाजी विक्रेते आणि शेतकर्‍यांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला आहे. भाजी विक्रेते शेतकरी व छोट्या व्यावसायिकांनी आ. लहू कानडे आणि उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून करोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली.दरम्यानच्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यापार्‍यांसह शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपासून संचारबंदी शिथील करत शासनाने अनेक छोटे व्यवसाय चालू केले आहेत. त्यानुसारच भाजी विक्रेते शेतकरी व व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत. मात्र नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक व्यावसायिकांना त्रास देण्याचे काम करत आहेत. भाजी विक्रेते शेतकरी व व्यावसायिकांना दमदाटी करणे, दंड वसूल करणे, शेतमाल जप्त करणे अशा प्रकारच्या कारवाया पालिका प्रशासन करीत आहे. पालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे भाजी विक्रेते आणि शेतकर्‍यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले आहे.संचारबंदीमध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागत असल्याने बर्‍याचशा नागरिकांनी भाजी विक्रीचा पर्याय निवडून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पालिका प्रशासनाने भाजी विक्रेते आणि शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी फक्त जागा निश्चित केली. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याबद्दल कुठलेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे दिवसभर भाजी विक्री करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणार्‍या भाजी विक्रेत्यांवर पालिका प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा फटका बसत आहे.भाजी विक्रेत्यांबाबत योग्य नियोजन केल्यास एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल आणि ग्राहक व विक्रेते यांना देखील सोयीचे होईल. त्यामुळे भाजी विक्रेते व शेतकरी यांच्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा. त्याकरिता नियोजनबद्ध आराखडा तयार करुन भाजी विक्रेत्यांना दिलासा द्यावा अन्यथा पालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस नगरसेवक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील, असा इशारा देखील उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिला आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावकडून निपाणीवडगाव- कडे जात असलेल्या मोटारसायकलवरील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, मोटारसायकल असा एकूण 1 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अशोकनगर, निपाणीवडगाव भागातील पसार आरोपींचा शोध पोलीस घेत असताना यातील सुनील देवराम पवार हा अशोकनगर येथील गुन्हेगार कारेगावकडून येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या भागात सापळा लावला. पोलिसांना कारेगावकडून एक मोटारसायकल येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी या मोटारसायकलला थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतु मोटारसायकलस्वाराने ही मोटारसायकल न थांबवता जोरात निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे व महेंद्र पवार यांनी मोटारसायकलच्या मागे बसलेल्या इसमास धरून खाली ओढले व मोटारसायकलस्वार काही अंतरावर जाऊन खाली पडला. पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले.यात सुनील देवराम पवार (अशोकनगर), अजित बबन आसने (रा. कारेगाव) येथील असून त्यांच्या कमरेला खोचलेला एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा मॅग्झीनसह त्यास चॉकलेटी काळ्या रंगाची मूट असलेला गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, त्यावर केएफ 16 व 9 एमएम 2 झेडतसेच एमएच 17 सीके 7302 या क्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल असा 1 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. सेकंड1002/2020 प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील देवराम पवार हा अशोकनगर निपाणीवडगाव येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तीन, राहुरी, लोणीत प्रत्येकी एक व शिर्डी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. के. लोंढे, सुनील दिघे, महेंद्र पवार, गणेश गावडे, किशोर जाधव, पंकज गोसावी या पथकानेही कामगिरी केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)- दौंड रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नगर तालुका पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी हॉटेलचा मालक, मॅनेजरसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार ज्ञानेश्वर खिळे यांनी फिर्याद दिली आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी अद्याप हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही. हॉटेल बंदी असताना नगरमध्ये चक्क हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या पार्लरवर छापा टाकून हॉटेलचा मालक सतीश किसनराव लोटके, मॅनेजर अरुण बाबासाहेब डमडेरे यांच्यासह एकूण 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.दौंड रोडवर अरणगाव येथे एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर व दारू विक्री सुरू असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा याठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी दोन सीलबंद सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचे बॉक्स, सहा अर्धवट वापरलेले तंबाखूजन्य पदार्थांचे बॉक्स, साडेतीन हजार रुपयांचे हुक्का स्पॉटचे सात संच, सात बाटल्या विदेशी मद्य आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.हॉटेल मालक असलेले सतीश लोटके हे नाट्य कलावंत असून, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आहेत. तसेच हॉटेल मालकाचे जवळचे नातेवाईक एका राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच इतर आरोपी देखील मोठ्या घरचे आहेत. या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन असतानाही हा प्रकार करण्याचे धाडस झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यास राजकीय पाठबळ होते का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. किती दिवसांपासून हे सुरू होते, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे. हॉटेलमध्ये हुक्का बरोबरच मद्यविक्री सुद्धा सुरू असल्याचे आढळून आले आहे.आरोपी सर्व नगरचे असून यामध्ये हॉटेलचा मालक सतीश किसनराव लोटके, मॅनेजर अरुण बाबासाहेब डमडेरे, श्रेयस संजय कोठरी, अभिषेक अदाके संचेती, घनश्याम बारुक ठोकळ, किरण छगनराव निकम (बुरुडगाव रोड), रमेश प्रमोद शहा (कापड बाजार), आदित्य सतीश ईदानी (महेश टॉकीज मागे), मोहित कृष्णकांत शहा, रोहित नितीन शहा (खिस्त गल्ली), अंकित महेश लुणिया (माळीवाडा), अंकित अमृतलाल कोठारी (वसंत टॉकीज जवळ), गणेश संजय डहाळे (तोफखाना), दीपक जितेंद्र गिडवाणी (शीला विहार), यश कन्हैयालाल लुभिया (मिस्किन नगर), आदित्य गोरख घालमे (गुजर गल्ली), करण विजय गुप्ता (गंजबाजार), किसन चंद्रकुमार माखिजा (प्रोफेसर कॉलनी) व दोन मुली अशा 20 जणांचा समावेश आहे.

       
अहमदनगर दि.२०- भारतीय सैन्य दलातून बडतर्फ असतानाही सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडण्यात आले. प्रशांत भाऊराव पाटील (वय३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची संयुक्त पथकाने केली. 

बुलडाणा - 21 जून
गुम्मी वन वर्तुळ मधुन एका प्रकरणात जप्त करण्यात आलेले लाकुड विनापरवानगी घेऊन जाणाऱ्या ट्रकला बुलडाणा वन विभागाने पकडले असून 3 आरोपी अटक करण्यात आले असून एवढा धाडस करणारा मुख्य लाकुड तस्कराला पकडने वनविभागासाठी चैलेंज ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.
    प्राप्त माहितीनुसार बुलडाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या गुम्मी वर्तुळ मधील ग्राम तराडखेड
 शिवारात एका शेतातील मोहा झाडांची 10 मे 2020 रोजी विनापरवानगी अवैधरित्य कटाई केल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने सदर ठीकाणी अंदाजे 5 टन लाकुड जप्त करुण धाड येथील शेख शाकिब शेख मोबीन व इतर 4 अशे 5 आरोपींवर वन गुन्हा दाखल करून आरोपी शाकिबला अटक करण्यात आले होते.या कार्रवाईतील जप्त लाकुडला जप्ती हैमर मारून वनविभागाने तब्यत घेतले व सदर लाकुड त्याच ठीकाणी ठेवलेले होते.काल 20 जूनच्या रात्री सदर जप्त लाकुड एका ट्रक मध्ये भरले जात आहे,अशी माहिती वन विभागाला मिळताच बुलडाणा डीएफओ संजय माळी,एसीएफ रणजीत गायकवाड व आरएफओ गणेश टेकाळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल के.बी.शेख,वनरक्षक समाधान मान्टे, संदीप मडावी हे रात्री तराडखेड शिवारात पोहोचले असता त्यांना ट्रक क्र.एमएच-19-झेड-5635 मध्ये आगोदरच जप्त केलेले लाकुड भरलेले दिसून आले.मोका स्थळावरुन उडनगांव ता. सिल्लोड जि.औरंगाबाद यांना ताब्यात घेऊन लाकुडसह सदर ट्रक जप्त करुण बुलडाणा येथील शासकीय लाकुड आगारात जमा करण्यात आले असून सद्या 3 आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरचे आगोदरच जप्त असलेले लाकुड अवैधरित्य कोणी विकला आहे का? आता हे समोर येणे महत्वाचे ठरणार आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget