नेवासा (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीच्या आत्येभावाने दिली असून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली.वैष्णवी आरगडे या अल्पवयीन मुलीचा रविवारी सकाळी झोपेतच संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या घरच्यांनी सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची बनाव निर्माण केला होता. तथापि मृतदेहाचे नगर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता श्वास नलीकेवर कशाने तरी दबाव टाकून व त्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू आला असले बाबत अभिप्राय डॉक्टरांनी दिला होता. या अभिप्राय नुसार यातील मयत वैष्णवी सोमनाथ आरगडे (वय 9 वर्षे) रा .सौंदाळा ता.नेवासा हीस दि. 20 जून चे रात्री 10 वा. ते 21 जून रोजी पहाटे 6 वाजेचे दरम्यान राहते घरात सौंदाळा ता.नेवासा येथे झोपेत असताना तीस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासांठी तीचे श्वासनलिकेवर दबाव टाकुन तीस जीवे ठार मारुन तीचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत हवालदार भिमराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार दि.22 जून रोजी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द भारतीय दंड विधान कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सोमवारी दिवसभर आरोपींना शोधण्यासाठी पराकाष्ठा केली.शेवटी त्यांनी सौंदाळा येथे मामाकडेच राहत असलेला आणि या घटनेत सुरुवातीपासूनच संशयित असलेला मयत मुलीच्या आत्याचा मुलगा आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय 22 वर्षे) मूळ रा.आपेगाव,ता.पैठण याला एलसीबीच्या विशेष पथकाने चांगलाच पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली.दरम्यान शवविच्छेदानंतर रविवारी रात्री उशिरा वैष्णवीच्या पार्थिवावर सौंदाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. सोमवार दि.22 जून रोजी अपर पोलीस अधिक्षक डॉ.दीपाली काळे, उपअधीक्षक मंदार जवळे हे तळ ठोकून होते. त्यांनी पुन्हा सौंदाळा गावी भेट देऊन चौकशी करुन ठोस धागा मिळवण्याचा प्रयत्न केला.
Post a Comment