कट्ट्यासह श्रीरामपुरातील सराईत गुन्हेगार जेरबंद,1 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगावकडून निपाणीवडगाव- कडे जात असलेल्या मोटारसायकलवरील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, मोटारसायकल असा एकूण 1 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.अशोकनगर, निपाणीवडगाव भागातील पसार आरोपींचा शोध पोलीस घेत असताना यातील सुनील देवराम पवार हा अशोकनगर येथील गुन्हेगार कारेगावकडून येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या भागात सापळा लावला. पोलिसांना कारेगावकडून एक मोटारसायकल येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी या मोटारसायकलला थांबविण्याचा प्रयत्न केला.परंतु मोटारसायकलस्वाराने ही मोटारसायकल न थांबवता जोरात निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे व महेंद्र पवार यांनी मोटारसायकलच्या मागे बसलेल्या इसमास धरून खाली ओढले व मोटारसायकलस्वार काही अंतरावर जाऊन खाली पडला. पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले.यात सुनील देवराम पवार (अशोकनगर), अजित बबन आसने (रा. कारेगाव) येथील असून त्यांच्या कमरेला खोचलेला एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा मॅग्झीनसह त्यास चॉकलेटी काळ्या रंगाची मूट असलेला गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, त्यावर केएफ 16 व 9 एमएम 2 झेडतसेच एमएच 17 सीके 7302 या क्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल असा 1 लाख 35 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. सेकंड1002/2020 प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील देवराम पवार हा अशोकनगर निपाणीवडगाव येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तीन, राहुरी, लोणीत प्रत्येकी एक व शिर्डी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जे. के. लोंढे, सुनील दिघे, महेंद्र पवार, गणेश गावडे, किशोर जाधव, पंकज गोसावी या पथकानेही कामगिरी केली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget