Latest Post

प्रतिनिधी-
स्वातंत्र्य  दिन साजरा होत असताना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खा.गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात देखील मोठ्या उत्साहात 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला.
या वेळी माजी  जिल्हा न्यायाधीश श्री.भारतकुमार सातव साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मा.न्यायमूर्ती सातव साहेब यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले, त्याच बरोबर त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.राजभोज एस.एस यांनी त्यांचे स्वागत केले,ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या कांबळे मॅडम यांनी देखील प्रसंगी शुभेच्छा दिल्या,उप प्राचार्या कवडे मॅडम, मा.विश्वस्त करंदीकर मॅडम प्रा.ज्योती शिंदे,प्रा.क्रांती बागुल,प्रा. शिल्पा बींगी त्याच बरोबर शिक्षक विध्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी रवी हळनोर यांनी उपस्थितांचे आभार मानले



पाथर्डी_प्रतिनिधी सचिन दिनकर
          पाथर्डी_राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डी येथे येत असुन बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्या  सभेच्या  नियोजनाची बैठक व भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आ. राजळे यांच्या व्हाईट हाऊस या संपर्क कार्यालयच्या आवारात आयोजन करण्यात आली. 
          खा. विखे म्हणाले राज्यात सरकार कोणाचे येणार हा विषय चर्चेचा राहिलेला नाही.एवढा विश्वास मुख्यमंत्र्यांनी कमावला आहे. अत्यंत स्वच्छ ,पारदर्शी व गतीमान सेवा देत सर्व संकटांना सामोरे जात कौशल्याने प्रश्नांची हाताळणी करणारा मुख्यमंत्री आपण यापूर्वी पाहिलेला नाही. राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्याकडून मार्गी लावुन चारीचा टप्पा क्रमांक दोन बाबत मुख्यमंत्र्याचे जिल्हा दौऱ्यात लक्ष वेधु . राहुरी नगर नेवासे, , शेवगाव ,पाथर्डी तालुक्यातील सिंचन क्षेत्र चारीच्या  पाण्यावर अवलंबुन असून पाथर्डी तालुक्यातील सर्व १०२ पाझर तलाव भरून मढी पर्यंत चारीचे पाणी आणण्याची मी व आमदार मोनिकाताई राजळे मिळुन पार पाडू. आज पासुन प्रवरा उद्योग समुहाचे ३० कर्मचारी चारी परिसरात देखरेख करण्याचे काम करतील. राज्यातुन बाहेर जाणारे पाणी दुष्काळ ग्रस्त भागासह अन्यत्र वळविण्यासाठी आराखडा राज्याने केंद्राकडे सादर केला आहे त्याला निधी मंजुर होताच कामाला प्रारंभ होईल.मोनिकाताई राजळे  आमदार आहेत पुन्हा त्याच आमदार असतील. पक्षात कोणाला यायचे तर या पण उमेदवारी मात्र मोनिकाताई  यांनाच असेल. ज्यांना पक्षात यायचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश करून योगदान दया, कार्य करा त्यांचे काम पाहुन पुढच्या वेळी त्यांचा विचार करू. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी पुर्ण अहवाल दिला आहे. असे प्रतिपादन खा. डॉ.सुजय विखे यांनी केले.
     यावेळी बोलतांना आमदार राजळे म्हणाल्या मुख्यमंत्र्याचा दौरा ऐतीहासीक स्वरूपाचा ठरावा यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गेल्या पाच वर्षात राज्यावर अनेक संकटे आली मोठी आंदोलने झाली पण अत्यंत खंबीरपणे तोंड देत मुख्यमंत्र्यानी कर्तृत्व सिद्ध केले.तावुन सलाखुन निघत त्यांनी राज्याला विकासाचा नवा चेहरा दिला. रविवारी सकाळी नगर, भिंगार, कौडगाव मार्गे करंजी ,तिसगाव या ठिकाणी त्यांचे स्वागत होईल व पाथर्डी शहरात बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा होईल त्यानंतर ही यात्रा बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे  सर्वच  कामाला लागले असुन प्रत्येक पदाधिकाऱ्यांने गावपातळीवरील कार्यकर्त्यांना महाजनादेश यात्रेसाठी एकत्र आणावे तसेच जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहुन यात्रा यशस्वी करावी. पक्ष व शासनाची धोरणे केलेली कामे व जनतेच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्याकडून लोकांशी संवाद साधला जाणार असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
            या वेळी आमदार मोनिकाताई राजळे, पक्षनिरीक्षक तथा महाजनादेश यात्रेचे समन्वयक प्रसाद ढोकरीकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी , सरचिटणीस जे.बी. वांढेकर, शेवगाव तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, जि.प. सदस्य राहुल राजळे,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, जेष्ठ नेते अशोक चोरमले, माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, काशिनाथ लवांडे, बंडू रासने,काकासाहेब शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, बापुसाहेब भोसले, चारूदत्त वाघ, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पुरूषोत्तम आठरे, अक्षय चमटे, पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, सुनिल परदेशी, रविंद्र वायकर, एकनाथ आटकर,गोकुळ दौंड, नगरसेवक प्रविण राजगुरू, रमेश गोरे, अनिल बोरूडे, नंदकुमार शेळके, नामदेव लबडे, अजय रक्ताटे, सचिन पालवे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष  नागनाथ गर्जे,  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, सुरेखाताई ढाकणे, नगरसेविका मंगल कोकाटे, ज्योती मंत्री यांच्यासह विविध संस्थाचे, पक्षाचे पदाधिकारी ,सरंपच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सुत्रसंचालन राजीव सुरवसे  तर आभार उमेश भालसिंग यांनी मानले.

श्रीरामपूर(वार्ताहर)-
सकल जैन समाजाच्यावतीने सांगली व कोल्हापुर जिल्हयात पुरामुळे बेचिराग झालेले कुंटुबाना मदतची हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जयqसगपुर येथे असलेल्या आचार्य श्री विद्यासागरजी महाराज ट्रस्टला रोख स्वरुपात रक्कम देण्यात आली. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या भागात जाऊन जैन बांधवाणी हि मदत स्व:हताने केली.
सांगली -कोल्हापुर जिल्हायात पुराच्या पाण्याने नागरिकाचे मोठे हाल झाले आहे. होत्यांचे नसल्यात रुपातंर झाले. अनेक गावी पाण्याखाली गेली. काही गावाना तर अठवड्यानंतर मदत पोहचुशकली असी परिस्थिती पहिल्यादांच या भागात झाली आहे. या भागातील नागरिकांना मदत करावी अशी चर्चा समाजात सुरु झाली ठिकठिकाणवरुन या ठिकाणी मदत पोहचत असल्याच्या बातम्या येऊन लागल्या. केलेली मदत संबधीतात पर्यंत पोहचत नाही असा सुर ही सर्वत्र ऐकु येत होता.
श्रीरामपूर qदगबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलिवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, यांच्या पुढाकारातुन श्रीक्षेत्र कंचनेरचे कार्यकरणी संचालक प्रशांत एन. पाटणी,पंकज पांडे, नवयुक मंडळाचे अध्यक्ष पंकज गोधा, व विरसेवादलाचे महावीर पाटणी हे चौघेजन मदत घेऊन जाण्यासाठी पुढे आलेत. समाजातील सर्वसामान्या पासुन सर्वानी आर्थिक भार उचला.
किराणा सामान यात साखरे पासुन मिठा तसेच कपडयापर्यंत चे पदार्थ मदतीच्या स्वरुपात देण्यात आले.यासर्व वस्तुची एकत्र असा मोठा बॉक्स बनवण्यात येऊन प्रत्येक नागरिकाना तो मिळेल असे बनवण्यात आले. हे बनवलेले बॉक्स या गावात जाऊन प्रत्यक्ष देण्यात आले.  रोख रक्कम जनवèयाचा चाèयासाठी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य व दक्षिणीची बाजु खंबिरपणे संभाळणारे तात्याभैया यांच्याकडे स्पुर्तत करण्यात आले. यामध्ये हालोंडी, मजरेवाडी, दत्तवाड, रांगोळी या गावात प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यात आली. श्रीरामपूर सकल जैन समाजाच्यावतीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन लाभार्थीना मदत करण्यात आल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकामी गेले प्रशांत नेमिचंद पाटणी, पंकज पांडे, पंकज गोधा, महावीर पाटणी यांनी तीन दिवस या पुरग्रस्तभागात
जाऊन मदत केली. याबद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. 


पिंपरी-
चिंचवडमध्ये परराज्यातून विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ लाख रुपयांचे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज जप्त केला आहे. अनिल राजभर (३६) असे या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात दोन दिवसात थेरगाव आणि वाकड येथे घरफोडी करण्यात आली होती. यावेळी एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरण्यात आले होते. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी हा विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून त्या दरम्यान परिसरातील भागात रेकी करून दिवसा घरफोड्या करायचा.



भारतीय लहुजी सेना च्ये विविध मागनिसाठी   आमरण उपोषण
     भारतीय लहुजी सेना च्ये आमरण उपोषणाचे आज तिसरे दिवस आसुन कोणत्याही प्रकारचे प्रशासन दखल घेतली नसुन सेना चे बाळासाहेब बागूल व हानिफ भाई पठान, यांचे आरोग्य जिवनाचे पातळी घसरली आहे
   प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दखल नघेतल्यास हेउपोषण आजुन त्रिवयसोरूपाने करूं असा इशारा भारतीय लहुजी सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, शेख अहमद निसार ,जलिल भाई शेख आदी याणिकेले आहे

नवी दिल्ली :
स्टेट बँक ऑफ़ इंडियाने पुढील पाच वर्षांत डेबिट कार्ड बंद करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार डिजिटल व्हावा, यासाठी बँकने ही तयारी केल्याचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली आहे.
देशात आज ९० कोटी डेबिट व ३ कोटी क्रेडिट कार्ड्स आहेत. त्यापैकी डेबिट कार्ड बंद करण्याची तयारी बँकेने सुरू केली आहे. डिजिटल ट्रॅन्झक्शन व क्यूआर कोडचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, देशातील अनेक एटीएममध्ये आम्ही योनोची (यू ओन्ली नीड वन) सुविधा दिली आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे केवळ मोबाइलद्वारेच पैसे काढणे शक्य होते व सर्व खरेदी व विक्रीचे व्यवहारही योनोमार्फत करता येतात. त्यामुळे ग्राहकांनी योनो कॅशसेवेचाच वापर करावा.

जळगाव-
शहरात पोलीसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज चोरी, घरङ्गोडीच्या घटना उघडकीस येत आहे. अद्याप चोरट्यांपर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश आलेले नाही. मागील अडीच महिन्यात शहरात जवळपास ५० चोरीच्या घटना घडल्या आहे. त्यातच मंगवारी सकाळी तालुका पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिराशिवा कॉलनीतील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी जवळपास सहा लाखांचा ऐवज लांबवून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एस.पी.साहेब चोरी, घरफोडीच्या घटना थांबतील का? असा संतप्त सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.चोरी, घरफोडीच्या घटनामुळे पोलीस हतबल झाले आहे. दररोज चोरी, घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहे. शहरातील निमखेडी शिवारातील हिराशिवा कॉलनीत सुनंदा राजेंद्र भावसार यांचे घर आहे. राजेंद्र भावसार यांचे निधन झाले असल्याने जळगावातील घरी सुनंदा भावसार ह्या राहतात. मुलगा विशाल हा ठाणे येथे तर लहान मुलगा पुणे येथे नोकरी निमित्त आहे. दरम्यान सुनंदा भावसार व त्यांची मुलगी कोमल हे दोघे नाशिक येथे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे हिराशिवा कॉलनीतील घर बंद होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरात मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामधील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी ५.३० वाजता भावसार कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर त्यांनी घरात पाहिल्यानंतर समान अस्तावस्त फेकलेला दिसून आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget