राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑगस्ट रोजी पाथर्डीत

पाथर्डी_प्रतिनिधी सचिन दिनकर
          पाथर्डी_राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डी येथे येत असुन बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे त्या  सभेच्या  नियोजनाची बैठक व भाजप सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आ. राजळे यांच्या व्हाईट हाऊस या संपर्क कार्यालयच्या आवारात आयोजन करण्यात आली. 
          खा. विखे म्हणाले राज्यात सरकार कोणाचे येणार हा विषय चर्चेचा राहिलेला नाही.एवढा विश्वास मुख्यमंत्र्यांनी कमावला आहे. अत्यंत स्वच्छ ,पारदर्शी व गतीमान सेवा देत सर्व संकटांना सामोरे जात कौशल्याने प्रश्नांची हाताळणी करणारा मुख्यमंत्री आपण यापूर्वी पाहिलेला नाही. राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येऊन देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्याकडून मार्गी लावुन चारीचा टप्पा क्रमांक दोन बाबत मुख्यमंत्र्याचे जिल्हा दौऱ्यात लक्ष वेधु . राहुरी नगर नेवासे, , शेवगाव ,पाथर्डी तालुक्यातील सिंचन क्षेत्र चारीच्या  पाण्यावर अवलंबुन असून पाथर्डी तालुक्यातील सर्व १०२ पाझर तलाव भरून मढी पर्यंत चारीचे पाणी आणण्याची मी व आमदार मोनिकाताई राजळे मिळुन पार पाडू. आज पासुन प्रवरा उद्योग समुहाचे ३० कर्मचारी चारी परिसरात देखरेख करण्याचे काम करतील. राज्यातुन बाहेर जाणारे पाणी दुष्काळ ग्रस्त भागासह अन्यत्र वळविण्यासाठी आराखडा राज्याने केंद्राकडे सादर केला आहे त्याला निधी मंजुर होताच कामाला प्रारंभ होईल.मोनिकाताई राजळे  आमदार आहेत पुन्हा त्याच आमदार असतील. पक्षात कोणाला यायचे तर या पण उमेदवारी मात्र मोनिकाताई  यांनाच असेल. ज्यांना पक्षात यायचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्रवेश करून योगदान दया, कार्य करा त्यांचे काम पाहुन पुढच्या वेळी त्यांचा विचार करू. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी पुर्ण अहवाल दिला आहे. असे प्रतिपादन खा. डॉ.सुजय विखे यांनी केले.
     यावेळी बोलतांना आमदार राजळे म्हणाल्या मुख्यमंत्र्याचा दौरा ऐतीहासीक स्वरूपाचा ठरावा यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. गेल्या पाच वर्षात राज्यावर अनेक संकटे आली मोठी आंदोलने झाली पण अत्यंत खंबीरपणे तोंड देत मुख्यमंत्र्यानी कर्तृत्व सिद्ध केले.तावुन सलाखुन निघत त्यांनी राज्याला विकासाचा नवा चेहरा दिला. रविवारी सकाळी नगर, भिंगार, कौडगाव मार्गे करंजी ,तिसगाव या ठिकाणी त्यांचे स्वागत होईल व पाथर्डी शहरात बाजार समितीच्या मैदानावर जाहीर सभा होईल त्यानंतर ही यात्रा बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे  सर्वच  कामाला लागले असुन प्रत्येक पदाधिकाऱ्यांने गावपातळीवरील कार्यकर्त्यांना महाजनादेश यात्रेसाठी एकत्र आणावे तसेच जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत राहुन यात्रा यशस्वी करावी. पक्ष व शासनाची धोरणे केलेली कामे व जनतेच्या मागण्याबाबत मुख्यमंत्र्याकडून लोकांशी संवाद साधला जाणार असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
            या वेळी आमदार मोनिकाताई राजळे, पक्षनिरीक्षक तथा महाजनादेश यात्रेचे समन्वयक प्रसाद ढोकरीकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शहराध्यक्ष अजय भंडारी , सरचिटणीस जे.बी. वांढेकर, शेवगाव तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, जि.प. सदस्य राहुल राजळे,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, शेवगावचे उपनगराध्यक्ष वजीर पठाण, जेष्ठ नेते अशोक चोरमले, माजी जि.प.सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, काशिनाथ लवांडे, बंडू रासने,काकासाहेब शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, बापुसाहेब भोसले, चारूदत्त वाघ, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पुरूषोत्तम आठरे, अक्षय चमटे, पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, सुभाष केकाण, सुनिल परदेशी, रविंद्र वायकर, एकनाथ आटकर,गोकुळ दौंड, नगरसेवक प्रविण राजगुरू, रमेश गोरे, अनिल बोरूडे, नंदकुमार शेळके, नामदेव लबडे, अजय रक्ताटे, सचिन पालवे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष  नागनाथ गर्जे,  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार, सुरेखाताई ढाकणे, नगरसेविका मंगल कोकाटे, ज्योती मंत्री यांच्यासह विविध संस्थाचे, पक्षाचे पदाधिकारी ,सरंपच, उपसरपंच यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, सुत्रसंचालन राजीव सुरवसे  तर आभार उमेश भालसिंग यांनी मानले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget