सकल जैन समाजाचा पुरग्रस्तांना थेट मदतीचा हात

श्रीरामपूर(वार्ताहर)-
सकल जैन समाजाच्यावतीने सांगली व कोल्हापुर जिल्हयात पुरामुळे बेचिराग झालेले कुंटुबाना मदतची हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जयqसगपुर येथे असलेल्या आचार्य श्री विद्यासागरजी महाराज ट्रस्टला रोख स्वरुपात रक्कम देण्यात आली. प्रत्यक्ष नुकसान झालेल्या भागात जाऊन जैन बांधवाणी हि मदत स्व:हताने केली.
सांगली -कोल्हापुर जिल्हायात पुराच्या पाण्याने नागरिकाचे मोठे हाल झाले आहे. होत्यांचे नसल्यात रुपातंर झाले. अनेक गावी पाण्याखाली गेली. काही गावाना तर अठवड्यानंतर मदत पोहचुशकली असी परिस्थिती पहिल्यादांच या भागात झाली आहे. या भागातील नागरिकांना मदत करावी अशी चर्चा समाजात सुरु झाली ठिकठिकाणवरुन या ठिकाणी मदत पोहचत असल्याच्या बातम्या येऊन लागल्या. केलेली मदत संबधीतात पर्यंत पोहचत नाही असा सुर ही सर्वत्र ऐकु येत होता.
श्रीरामपूर qदगबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलिवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, यांच्या पुढाकारातुन श्रीक्षेत्र कंचनेरचे कार्यकरणी संचालक प्रशांत एन. पाटणी,पंकज पांडे, नवयुक मंडळाचे अध्यक्ष पंकज गोधा, व विरसेवादलाचे महावीर पाटणी हे चौघेजन मदत घेऊन जाण्यासाठी पुढे आलेत. समाजातील सर्वसामान्या पासुन सर्वानी आर्थिक भार उचला.
किराणा सामान यात साखरे पासुन मिठा तसेच कपडयापर्यंत चे पदार्थ मदतीच्या स्वरुपात देण्यात आले.यासर्व वस्तुची एकत्र असा मोठा बॉक्स बनवण्यात येऊन प्रत्येक नागरिकाना तो मिळेल असे बनवण्यात आले. हे बनवलेले बॉक्स या गावात जाऊन प्रत्यक्ष देण्यात आले.  रोख रक्कम जनवèयाचा चाèयासाठी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य व दक्षिणीची बाजु खंबिरपणे संभाळणारे तात्याभैया यांच्याकडे स्पुर्तत करण्यात आले. यामध्ये हालोंडी, मजरेवाडी, दत्तवाड, रांगोळी या गावात प्रत्यक्ष जाऊन मदत करण्यात आली. श्रीरामपूर सकल जैन समाजाच्यावतीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन लाभार्थीना मदत करण्यात आल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. याकामी गेले प्रशांत नेमिचंद पाटणी, पंकज पांडे, पंकज गोधा, महावीर पाटणी यांनी तीन दिवस या पुरग्रस्तभागात
जाऊन मदत केली. याबद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन करण्यात आले. 
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget