पिंपरी-
चिंचवडमध्ये परराज्यातून विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आठ लाख रुपयांचे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा ऐवज जप्त केला आहे. अनिल राजभर (३६) असे या आरोपीचे नाव आहे. उत्तर प्रदेशमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात दोन दिवसात थेरगाव आणि वाकड येथे घरफोडी करण्यात आली होती. यावेळी एकूण २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरण्यात आले होते. याप्रकरणी वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. महत्त्वाचं म्हणजे, आरोपी हा विमानाने येऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून त्या दरम्यान परिसरातील भागात रेकी करून दिवसा घरफोड्या करायचा.
Post a Comment