एस.पी.साहेब, चोरी, घरफोडी थांबतील का?

जळगाव-
शहरात पोलीसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज चोरी, घरङ्गोडीच्या घटना उघडकीस येत आहे. अद्याप चोरट्यांपर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश आलेले नाही. मागील अडीच महिन्यात शहरात जवळपास ५० चोरीच्या घटना घडल्या आहे. त्यातच मंगवारी सकाळी तालुका पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिराशिवा कॉलनीतील दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी जवळपास सहा लाखांचा ऐवज लांबवून नेल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एस.पी.साहेब चोरी, घरफोडीच्या घटना थांबतील का? असा संतप्त सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.चोरी, घरफोडीच्या घटनामुळे पोलीस हतबल झाले आहे. दररोज चोरी, घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहे. शहरातील निमखेडी शिवारातील हिराशिवा कॉलनीत सुनंदा राजेंद्र भावसार यांचे घर आहे. राजेंद्र भावसार यांचे निधन झाले असल्याने जळगावातील घरी सुनंदा भावसार ह्या राहतात. मुलगा विशाल हा ठाणे येथे तर लहान मुलगा पुणे येथे नोकरी निमित्त आहे. दरम्यान सुनंदा भावसार व त्यांची मुलगी कोमल हे दोघे नाशिक येथे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे हिराशिवा कॉलनीतील घर बंद होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरात मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामधील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवून नेला. सकाळी ५.३० वाजता भावसार कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर त्यांनी घरात पाहिल्यानंतर समान अस्तावस्त फेकलेला दिसून आला.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget