Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी)-महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान बेलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या वेदोत्सव परिक्षेत दधिमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील तसेच बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रीका पटकावली होती. 


श्रीराम जन्म भूमीचे गोविंददेवगिरी महाराज तथा किशोरजी व्यास महाराज यांच्या हस्ते महेश दायमा यांना सन्मानीत करण्यात आले होते. त्या यशानंतर महेश दायमा हे उद्या मंगळवार दि. १३ मे रोजी बेलापूर येथे आपल्या मुळ गावी येत असून त्यांच्या यशाबद्दल भव्य अशी मिरवणूक काढून सत्कार समारंभ आयोजित केला आहे.


उद्या मंगळवारी दुपारी ४ वाजता होणाऱ्या मिरवणूक व सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेलापूर ग्रमस्थ, गावकरी मंडळ, सकल राजस्थानी समाजाने केले आहे.

निधन वार्ता (नागर)-येथील सौ. हौसाबाई सोपानराव देसाई यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, दोन मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे नाऊर येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव देसाई यांच्या त्या पत्नी तर शरद, संजय व प्रदीप यांच्या त्या आई होत.बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई यांच्या त्या चुलती होत्या.त्यांच्यावर उद्या सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी नऊ वाजता नाऊर येथील गोदावरीतीरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


बेलापूर, प्रतिनिधी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री. मनोजजी आगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बेलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त सकाळी बेलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दैनिक जय बाबाचे कार्यकारी संपादक श्री. मनोजजी आगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यानंतर, ग्रामपंचायत बेलापूर येथे श्री. मनोजजी आगे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. आगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमांना जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे सचिव देविदास, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, दैनिक जय बाबाचे प्रतिनिधी दिलीप दायमा, पत्रकार सुहास शेलार, बाबा शेख, मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अरुणोदय पतसंस्थेचे संचालक संजय गोरे, गावकरी संस्थेचे संचालक प्रवीण बाठीया, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार, विजय कटारीया, महेश कुऱ्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी श्री. मनोजजी आगे यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


बेलापूर(प्रतिनिधी) गेल्या चार दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेले युद्ध पाकिस्तानने विनंती केल्याने अखेर शस्त्र संधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने घोषणा देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली भारत पाकिस्तान दरम्यान गेल्या सात तारखेपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारताने पहलगाम हल्याचा बदला घेण्याकरता नऊ अतिरेकी अड्डे उध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्तानने भारताच्या नागरि वस्त्यावर हल्ले सुरू केले. त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोन च्या साह्याने लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला .परंतु भारताच्या सैन्य दलाने हा हल्ला परतून लावला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील भारताने संयम राखत केवळ अतिरेकी असलेल्या ठिकाणावरच हल्ले केले.आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घेत शस्त्र संधी करणे भाग पडले. याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ सत्यमेव जयते ग्रुपचे वतीने फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम ,जय जवान जय किसान, सैन्यदलाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा हातात घेऊन सत्यमेव जयते ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर झेंडा चौकात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कंड,पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,विलास नागले,अँड. पांडुरंग कोकणे, बाबुलाल पठाण, भगीरथ मुंडलिक,जाकीर शेख,दिलीप दुधाळ,नंदकिशोर दायमा,विशाल आंबेकर, किरण गागरे,गोपी दाणी,गणेश मगर,महेश कुऱ्हे, संजय शिंदे, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठीया ,राधेशाम आंबिलवादे,दिलीप अमोलिक,अजीज सय्यद, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, इरफान शेख,सुभाष मोहिते, राहुल माळवदे, बबन मेहेत्रे ,सचिन कणसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


कोपरगाव (गौरव डेंगळे) – ट्रॅडिशनल शोतोकन कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी आयोजित होणारी वार्षिक ब्लॅक बेल्ट परीक्षा आणि प्रशिक्षण शिबिर यंदा दिनांक ४ मे ते ६ मे २०२५ दरम्यान कोपरगाव येथे यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात व परीक्षेत राज्यभरातून एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथून ७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या शाळेतील आपेक्षा भगत,साईशा जोरी आणि भार्वी थोरात यांनी उत्तम कामगिरी करत प्रथमच ब्लॅक बेल्ट प्राप्त केला. तर हर्ष लंगोटे याने दुसऱ्या डिग्रीचा ब्लॅक बेल्ट (2nd Dan) मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सरस ठोळे,आदर्श भगत, धनश्री सोनवणे, अनन्या पुनकर व शिवकन्या घोरपडे यांनी ब्लॅक बेल्ट कॅम्पमध्ये सहभागी होऊन प्रात्यक्षिकांद्वारे कराटेच्या तंत्रांची प्रगती साधली.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षिका वर्षा देठे यांचा 'बेस्ट इन्स्ट्रक्टर' म्हणून सन्मान करण्यात आला.त्यांनी दीर्घ काळापासून शिस्तबद्ध प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि आत्मसंरक्षण कौशल्य विकसित केले आहे.त्यांच्या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे  शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, शिक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाने, नथाली फर्नांडिस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा व शिबिराचे आयोजन शिहान सुदर्शन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कराटेचे शारीरिक व मानसिक महत्व पटवून दिले. शिबिरात काता (तांत्रिक हालचाली), कुमिटे (लढाईचे तंत्र), ब्रेकिंग टेक्निक्स, डिसिप्लिन, शारीरिक तंदुरुस्ती आणि कराटेचे मूलभूत तत्त्वज्ञान यावर विशेष भर देण्यात आला.

या यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव वाढला असून,पालक व शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षिकेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

बेलापूर (प्रतिनिधी)--सनातन संस्थेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करत असलेले परमश्रद्धेय डॉ. जयंत आठवले यांचे कार्य अलौकिक आहे. त्यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे 17, 18 ,व 19 मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा हा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या शुभसंदेशात काढले आहेत.


  सनातन संस्थेचे डॉ आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशात स्वामी गोविंददेव गीरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.


    या महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे.


    त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे.  भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊ  आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी)-- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करून पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात जे 15 निष्पाप नागरिक मारले गेले त्या नागरिकांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.                          पहेलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला शब्द दिला होता की यातील एकालाही माफ केले जाणार नाही त्या पद्धतीने तिनही सैन्य दलाच्या मदतीने अतिरेकी प्रशिक्षण देणारे 9  केंद्र उध्वस्त करण्यात आले या घटनेचा बेलापूर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त  केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी देशातील निष्पाप नागरिकांवर व लहान मुलावर गोळीबार केला त्यात पंधरा नागरिक मरण पावले व एक जवान शहीद झाला. त्यांनाही बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विष्णुपंत डावरे, हाजी इस्माईल शेख, प्रफुल्ल डावरे, संजय भोंडगे,विलास मेहत्रे, रवींद्र खटोड, प्रशांत लड्डा, गोपी दाणी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुवालाल लुक्कंड,शांतीलाल हिरण ,बाळासाहेब दाणी,अशोक प्रधान, सतीश सोनवणे ,रत्नेश गुलदगड, डॉक्टर रवींद्र गंगवाल, भास्कर बंगाळ, बाबुलाल पठाण, राजेंद्र राशिनकर ,विजय कटारिया,रामनाथ शिंदे ,प्रवीण बाठीया, औदुंबर राऊत,मधुकर अवचिते,  ज्ञानेश्वर कुलथे इस्माईल आतार दिलीप दायमा संजय शिंदे सतिश सोनवणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देसाई यांनी केले तर विष्णुपंत डावरे यांनी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget